07 July 2020

News Flash

क्रिकेटमध्येही होतो वर्णद्वेष, ख्रिस गेलचा धक्कादायक आरोप

आपल्यालाही अनेकदा करावा लागलाय वर्णभेदाचा सामना

जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीला पोलिस कस्टडीमध्ये असताना आपले प्राण गमवावे लागले. २५ मे रोजी घडलेल्या या घटनेचे पडसाद आता संपूर्ण अमेरिकेत पसरत आहेत. जॉर्जला न्याय मिळावा यासाठी लाखो अमेरिकन नागरिक रस्त्यावर येऊन घोषणाबाजी करत आहेत. जागतिक पातळीवर या घटनेचा निषेध होत असताना, वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेलनेही क्रिकेटमध्ये वर्णद्वेष होत असल्याचं म्हटलं आहे.

“इतरांप्रमाणे प्रत्येक कृष्णवर्णीय व्यक्तीच्या आयुष्यालाही तितकंच महत्व आहे. वर्णद्वेष करणाऱ्या लोकांनी आम्हाला मूर्ख समजणं बंद करावं. कधीकधी आमच्यापैकी काही लोकं इतरांना वर्णद्वेष करण्याची संधी देत असतात, आपल्याला कमी लेखणं थांबवा असं आवाहन मी करेन. मी आतापर्यंत अनेक देश फिरून आलोय, मी कृष्णवर्णीय असल्यामुळे मलाही भेदभावाचा सामना करावा लागला आहे. विश्वास ठेवा वर्णद्वेष हा फक्त फुटबॉलमध्ये नाही तर तो क्रिकेटमध्येही आहे. अनेक संघांमध्ये हा प्रकार होतो.” अशा आशायचा संदेश गेलने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर लिहीला आहे.

क्रिकेटच्या मैदानावरही याआधी अनेकदा वर्णद्वेषाच्या घटना घडल्या आहेत. इंग्लंडचा नवोदीत अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चरला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात वर्णद्वेषी टिपण्णी ऐकावी लागली होती. आर्चरने सोशल मीडियावर याचा खुलासा केला होता. जॉर्जच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रदर्शन करणाऱ्या नागरिकांविरोधात सैन्यदल रस्त्यावर उतरवण्याचा इशारा दिला आहे. जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूप्रकरणात ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेवरही अमेरिकेत संताप व्यक्त होतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 2:35 pm

Web Title: not only in football racism exist in cricket also says chris gayle psd 91
Next Stories
1 “धोनीची तयारी बघण्यासाठी तरी क्रिकेट लवकर सुरू होऊदे”
2 घरी परतणाऱ्या कामगारांना मोहम्मद शमी करतोय अन्नदान, BCCI ने केलं कौतुक
3 ‘फ्लॉप’ क्रिकेटपटूंच्या यादीत नाव टाकल्याने खेळाडूच्या पत्नीचा संताप
Just Now!
X