बांगलादेशचे खेळाडू सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. सुरुवातीला बांगलादेशच्या अल हुसेन आणि रुबेल हुसेन या गोलंदाजांनी विराटवर स्लेजिंगचे आरोप केले. त्यानंतर फलंदाज इमरूल कयास याने विराटला मैदानावर कसं गप्प केलं याची एक कहाणी सांगितली. त्यानंतर आता बांगलादेशचा शब्बीर रहमान हा एका नव्या गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.

Video : विराट-अनुष्कामध्ये रंगला क्रिकेटचा सामना

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा त्याच्या चपळ खेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. डोळ्याची पाणी लवायच्या आता तो एखाद्या फलंदाजाला स्टम्पिंग करतो. अनेकदा त्याची ही किमया आपण पहिली आहे. मात्र शब्बीर रहमानने धोनीच्या स्टम्पिंगच्या वेगाला मात दिल्याची कहाणी त्याने क्रीकफ्रेंझीशी फेसबुक लाईव्हवर बोलताना सांगितली.

ते तीन शब्द अन्… द्रविड-लक्ष्मणने खेळून काढला अख्खा दिवस

“टी २० विश्वचषक स्पर्धेत बंगळुरू येथील सामन्यात मला धोनीने स्टम्पिंग केलं होतं. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतही त्याच्याकडे मला स्टम्पिंग करण्याची संधी होती, पण यावेळी मी त्याच्यापेक्षा चपळतेने पाय क्रिज मध्ये नेला आणि त्याला म्हंटलं ‘आज नाही..’ (तुला ती संधी मी आज पुन्हा देणार नाही)”, असा मजेशीर किस्सा त्याने सांगितला.

बांगलादेशी फॅन्सकडून अजिबात पाठिंबा मिळत नाही – रोहित शर्मा

“भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशात क्रिकेट खूपच जास्त लोकप्रिय आहे. दोन्ही देशांत क्रिकेट चाहत्यांची संख्या भरपूर आहे. पण बांगलादेश हा असा एक देश आहे जिथे भारतीय खेळाडूंना अजिबात पाठिंबा मिळत नाही. आम्ही अनेक देशातील अनेक मैदानांवर क्रिकेट खेळतो. सगळीकडे आम्हाला तेथील स्थानिक चाहत्यांचा पाठिंबा मिळत असतो. पण बांगलादेश मध्ये मात्र आम्हाला ते चित्र दिसत नाही. बांगलादेशचे चाहते केवळ त्यांच्याच संघातील खेळाडूंच्या पाठीशी उभे असतात, असे रोहित नुकतेच एका फेसबुक लाईव्ह चॅटमध्ये म्हणाला.