महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला नोटीस

बंगाल क्रिकेट संघटनेला स्नेहाशिष गांगुली आणि गार्गी बॅनर्जी यांना कार्यकारिणीवरील स्वीकृत खेळाडू सदस्य म्हणून हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) घटनेवर आधारित घटना नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने महाराष्ट्र क्रिकेट संघटना, हरयाणा क्रिकेट संघटना आणि तमिळनाडू क्रिकेट संघटना यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याचप्रमाणे बडोदा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीच्या क्रिकेट संघटनांवर घेण्यात आलेल्या आक्षेपासंदर्भात प्रशासकीय समिती चाचपणी करीत आहे. तसेच बंगाल क्रिकेट संघटनेला स्नेहाशिष गांगुली आणि गार्गी बॅनर्जी यांना कार्यकारिणीवरील स्वीकृत खेळाडू सदस्य म्हणून हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

READ SOURCE