अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीतून राफेल नदालने पुनरागमन केले असले तरी जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान एकदा पटकावण्याचे ध्येय नोवाक जोकोविचने ठेवले आहे.
रॉजर फेडररलाही तीन वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता आहे. अर्थात स्पर्धेतील फेडररच्या सहभागाबाबत अनिश्चितता असून मंगळवारी त्याबाबतचा निर्णय तो घेणार आहे. दुखापती आणि निवडक स्पर्धा खेळण्याच्या धोरणामुळे फेडरर पॅरिस खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये २०१५ पासून खेळलेला नाही. फेडररने मागील आठवडय़ात बॅसेल इथे झालेल्या स्पर्धेत कारकीर्दीतील ९९ वे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे तोदेखील लयीत खेळत आहे. ‘‘अमेरिकन आणि शांघाय खुल्या टेनिस स्पर्धामध्ये मी पूर्ण बहरात खेळलो आहे.
तसेच दुखापतीमुळे नदाल खेळत नसल्याने मी अन्य काही स्पर्धाची विजतेपदे पटकावली आहेत. तसेच जागतिक क्रमवारीतील त्याच्या गुणांच्या जवळ पोहोचणे शक्य झाले आहे. त्यामुळे वर्षअखेरच्या टप्प्यात अव्वल मानांकनाकडे झेप घेणे मला आवाक्यात आल्यासारखे वाटत आहे. त्याची मला जाणीव असल्याने सर्वोत्तम कामगिरी करून माझ्या परीने ते साध्य करण्याचा मी निश्चितच प्रयत्न करणार आहे,’’ असे जोकोविचने सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 30, 2018 1:51 am