नोव्हाक जोकोव्हिच हा ‘मेलबर्न पार्कचा राजा’ म्हणून ओळखला जातो. नऊ वेळा अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या जोकोव्हिचने एकदाही हार पत्करली नाही. रविवारी झालेल्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोव्हिचनं डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत जतेपदावर नाव कोरलं आहे. जोकोव्हिच यानं मेदवेदेवचा 7-5 6-2 6-2 अशा फरकानं पराभव केला.

चौथ्या मानांकित मेदवेदेवने अलीकडे पॅरिस मास्टर्स, एटीपी फायनल्स आणि एटीपी चषक जिंकले आहेत. मेदवेदेवला अमेरिकन खुल्या जेतेपदाने हुलकावणी दिली होती पुन्हा एकदा हुलकावणी दिली. तर जोकोव्हिचनं नवव्या ऑस्ट्रेलियन जेतेपद पटाकवलं आहे. मेदवेदेव हा मरात सॅफिननंतर (२००५) ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा रशियाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे.

 


अव्वल खेळाडूंविरुद्ध सहज विजय मिळवणाऱ्या मेदवेदेवने विजयाची मालिका अखंड राखली आहे. लंडनमध्ये मलाही त्याने सरळ सेटमध्ये पराभूत केले आहे. दमदार सव्‍‌र्हिस तसेच ताकदवान फोरहँड व बॅकहँड असलेल्या मेदवेदेने कामगिरीत प्रचंड सुधारणा केली आहे.  – नोव्हाक जोकोव्हिच