पॅरिस : सातव्यांदा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचने सोमवारी पुरुषांच्या एटीपी टेनिस क्रमवारीमध्ये आपले अग्रस्थान अधिक मजबूत केले. उपांत्यपूर्व फेरीआधीच पराभूत झालेल्या स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररच्या क्रमवारीत घसरण झाली असून तो सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
स्पेनच्या राफेल नदालला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तरी त्याने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. फेडररची तिसऱ्या स्थानावरून सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. अलेक्झांडर झ्वेरेव याने तिसरे स्थान पटकावले असून हुआन मार्टिन डेल पोट्रो चौथ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनने पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. जपानचा केई निशिकोरीने सातवे स्थान प्राप्त केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 29, 2019 1:01 am