पॅरिस : फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने युवा चाहत्याला रॅकेट भेट दिली. या भेटीनंतर युवा चाहत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ‘‘दोन सेट गमावल्यानंतरही हा चाहता माझ्या पाठीशी ठामपणे उभा होता. संपूर्ण लढतीदरम्यान त्याचा आवाज माझ्या कानात घुमत होता. पाठिंबा देण्याबरोबरच तो मला खेळ कसा करावा, हे सांगत होता. सव्‍‌र्हिसवर गुण मिळव, प्रतिस्पध्र्याच्या बॅकहँडवर हल्ले चढव, हे सल्ले तो मला देत होता. म्हणूनच सामना संपल्यानंतर मी त्याला रॅकेट भेट म्हणून दिली,’’ असे जोकोव्हिचने सांगितले. जोकोव्हिचने अंतिम फेरीत ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासवर पाच सेटमध्ये मात करून १९वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवले.