24 November 2020

News Flash

आता बुमराच्या मार्गदर्शनाची संधी -नवदीप

नवदीप आतापर्यंत एक एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-२० सामन्यांत खेळला आहे.

| January 4, 2020 12:04 am

गुवाहाटी : नवदीप सैनीने सहा मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरासह आतापर्यंत तरी त्याला नवा चेंडू वापरता आला नव्हता. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेत ही संधी चालून आल्याने नवदीपचा आनंद द्विगुणित झाला आहे.नवदीप आतापर्यंत एक एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-२० सामन्यांत खेळला आहे. दुखापतीमुळे किंवा विश्रांतीमुळे बुमरा गेले काही महिने भारताचे प्रतिनिधित्व करू शकला नाही. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. यासंदर्भात नवदीप म्हणाला की, ‘‘बुमराची गोलंदाजी पाहून मी बरेच काही शिकत आहे. मी आता माझ्या उणिवांबाबत त्याच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकेन. ही माझ्यासाठी उत्तम संधी असेल.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 12:04 am

Web Title: now the opportunity to get guidance from jasprit bumrah say navdeep saini zws 70
Next Stories
1 पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार सुरु; पुरी, अटकळे यांनी पटकावले सुवर्ण
2 Video : थरारक ! उसळता चेंडू थेट फलंदाजांच्या हेल्मेटमध्ये आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला
3 Ranji Trophy : मैदानात हायवोल्टेज ड्रामा, शुभमन गिलची पंचांना शिवीगाळ
Just Now!
X