News Flash

NZ vs ENG : मलानचे ४८ चेंडूत धडाकेबाज शतक

इंग्लंडने २० षटकात ठोकल्या २४१ धावा

इंग्लंड संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यातील टी २० मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर ७६ धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडच्या डेव्हिड मलानने केलेले तुफानी शतक आणि त्याला मॉर्गनची मिळालेली साथ यामुळे इंग्लंडने २० षटकांत ३ बाद २४१ धावा चोपल्या. त्यास प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडच्या संघाला १६५ धावांपर्यंतच मजल मारता आली. या विजयासह इंग्लंडने मालिका २-२ अशी बरोबरीत आणली.

या सामन्यात मलानने शानदार शतक करत इंग्लंडसाठी विक्रमाची नोंद केली. इंग्लंडकडून टी २० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम त्याने केला. मलानने ४८ चेंडूत १०१ धावांचा टप्पा गाठला. त्याने इंग्लंडच्या अलेक्स हेल्सचा विक्रम मोडला. इंग्लंडकडून टी २० मध्ये पहिले शतक अलेक्स हेल्स याने केले होते. त्याच्यानंतर शतक ठोकणारा मलान हा दुसरा फलंदाज ठरला. पण हेल्सने श्रीलंकेविरुद्ध शतक करण्यासाठी ६० चेंडू खेळले होते. त्यापेक्षा कमी चेंडूत मलानने शतक झळकावले.

मलानने ५१ चेंडूत नाबाद १०३ धावांची खेळी केली. ईश सोढीने टाकलेल्या १७ व्या षटकात त्याने २८ धावा कुटल्या. इतकेच नाही तर मलान आणि मॉर्गन यांनी इंग्लंडसाठी सर्वाधिक टी २० भागीदारीचीही नोंद केली. मलान आणि मॉर्गन यांच्यात १८३ धावांची भागीदारी झाली. न्यूझीलंडविरुद्ध या सामन्यात मलानने दमदार फलंदाजी केली.

आजच्या सामन्यातील मलानची खेळी खास ठरली कारण न्यूझीलंडचा संघ मालिकेत २-१ ने पुढे होता. या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला असता तर इंग्लंडचा मालिका पराभव झाला असता. पण मलानच्या खेळीने इंग्लंडने मालिकेत २-२ अशी बरोबरी केली. मॉर्गनचे शतक हुकले, पण त्यानेही दमदार ९१ धावां केल्या.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 4:38 pm

Web Title: nz vs eng new zealand vs england batsman david malan hits fastest century in t20 for england vjb 91
Next Stories
1 रोहित शर्मा भारतीय संघासाठी महत्वाचा खेळाडू – सौरव गांगुली
2 IND vs BAN : ‘तू पण उत्तुंग षटकार मारू शकतोस, फक्त ‘हे’ कर’; रोहितचा चहलला सल्ला
3 China Open : सात्त्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत!
Just Now!
X