News Flash

NZ vs SL : रॉस टेलरचे धमाकेदार शतक; मोडला विराट, सचिनचा विक्रम

न्यूझीलंडचा एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेला 'व्हाईटवॉश'

श्रीलंकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने ११५ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका न्यूझीलंडने ३-० अशी आपल्या नावे केली. तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडकडून अनुभवी फलंदाज रॉस टेलर याने १३७ धावांची झंझावाती खेळी केली आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.

या खेळीसह टेलरने भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी फलंदाज सचिन तेंडुलकर या दोघांचा विक्रम मोडला. टेलरही आजची खेळी ही त्याची ५०हून अधिक धावांची सलग सहावी खेळी केली. शेवटच्या सहा डावात त्याने नाबाद १८१, ८०, नाबाद ८६, ५४, ९० आणि १३७ अशा धावा केल्याआहेत. या पराक्रमासह त्याने सचिन आणि कोहलीचा विक्रम मोडला. या दोघांनी आपल्या कारकिर्दीत वन डे क्रिकेटमध्ये सलग ५ वेळा ५०हून अधिक धावांची खेळी केली होती. सचिनने १९९४ साली तर विराटने २०१२ साली हा पराक्रम केला होता.

टेलरव्यतिररिक्त हेन्री निकोल्सने १२४ धावांची शानदार शतकी खेळी साकारली. तसेच कर्णधार केन विलियम्सन ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४ विकेटच्या मोबदल्यात श्रीलंकेसमोर ३६४ धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ ४१.४ षटकांमध्ये २४९ धावांमध्ये गारद झाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १४० धावांची वादळी खेळी करून जयसूर्याचा विक्रम मोडणारा थिसारा परेरा याने तिसऱ्या सामन्यातही शानदार ८० धावांची खेळी केली. त्याचबरोबर निक डिकवेला ४६, धनंजया डिसिल्वा ३६ आणि कुसल परेराने ४३ धावा केल्या.

दरम्यान, टेलरने केलेल्या धमाकेदार फलंदाजीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 2:28 pm

Web Title: nz vs sl new zealand batsman ross taylor breaks virat kohli and sachin tendulkar record
Next Stories
1 आमच्या संघात कोणीही देव नाही, विराटचं कौतुक करताना शास्त्रींचा सचिनला अप्रत्यक्ष टोला
2 कसोटी क्रमवारीत ऋषभ पंतची मोठी झेप, धोनीलाही टाकलं मागे
3 Boom Boom आफ्रिदी! निवृत्तीनंतर टी२०मध्ये केला विक्रम
Just Now!
X