News Flash

कोट्रेलच्या हातातून निसटलेला बॉल थेट ‘शॉर्ट थर्ड मॅन’च्या दिशेने, व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल

न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात घडला प्रकार

न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सध्या टी-२० मालिका सुरु आहे. यजमान न्यूझीलंडने पहिल्या दोन टी-२० सामन्यात बाजी मारत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ फलंदाजी करत असताना एक मजेशीर प्रसंग घडला.

विंडीजचा शेल्डन कोट्रेल गोलंदाजी करत असताना त्याच्या हातातून चेंडू निसटून थेट फलंदाजाकडे जाण्याऐवजी शॉर्ट थर्ड मॅनच्या जागेवर उभ्या असलेल्या खेळाडूकडे गेला. सामन्यात १२ व्या षटकात हा प्रकार घडला, ज्यानंतर मैदानावर सर्व खेळाडू हसत सुटले होते. पाहा हा व्हिडीओ…

दरम्यान, २३९ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या विंडीजच्या संघाची सुरुवातच खराब झाली. ब्रँडन किंग जेमिन्सनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. यानंतर विंडीजच्या डावाला लागलेली गळती थांबली. एकही फलंदाज मैदानावर फारकाळ तग धरु शकला नाही. विंडीजचा संघ १६६ धावांपर्यंत मजल मारु शकला. न्यूझीलंडकडून जेमिन्सन आणि सँटनरने प्रत्येकी २-२ तर टीम साऊदी-फर्ग्युसन-सोधी आणि निशम या चौकडीने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

अवश्य वाचा – NZ vs WI : ग्लेन फिलीप्सचं झंजावाती शतक, विंडीजवर मात करत न्यूझीलंडने मालिका जिंकली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 12:08 pm

Web Title: nz vs wi ball slips out of sheldon cottrells hands flies towards the short third man psd 91
Next Stories
1 रोहितच्या दुखापतीबद्दल विराट-रवी शास्त्रींना देण्यात माहिती आली
2 निव्वळ वेडेपणा ! विराटच्या ‘त्या’ निर्णयावर माजी भारतीय गोलंदाजाची टीका
3 विराटची कॅप्टन्सी न समजण्यासारखी…सलग दुसऱ्या पराभवानंतर गंभीरची कोहलीवर टीका