दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील प्रस्तावित ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेचं आयोजन पुढे ढकलण्यात आलं आहे. आयसीसीने याबद्दल आज अधिकृत घोषणा केली.

दोन्ही क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करत हा निर्णय घेतला आहे. ४ डिसेंबर रोजी दोन्ही संघांमध्ये पहिला सामना रंगणार होता. परंतू आफ्रिकेच्या एका खेळाडूचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे हा सामना पुढे ढकलण्यात आला. यानंतर ६ तारखेला पहिल्या वन-डे सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतू खेळाडू राहत असलेल्या हॉटेलमधील एक कर्मचारी करोना पॉझिटीव्ह आढळून आल्यामुळे सामन्याच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

करोनामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांचं आयोजन करण्यासाठी आयसीसीने नियम, खेळाडूंचं मानसिक आणि शाररिक स्वास्थ्य लक्षात घेत दोन्ही क्रिकेट बोर्डांनी एकमताने ही मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात ही मालिक कधी खेळवली जाईल याबद्दल येत्या काही दिवसांमध्ये निर्णय घेतला जाणार आहे.