गोविंद पोड्डोरने केलेल्या नाबाद अर्धशतकामुळेच ओदिशाने ४ बाद १६७ धावा करीत रणजी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राला दमदार उत्तर दिले. त्याआधी महाराष्ट्राने पहिल्या डावात सर्व बाद २८१ धावा केल्या.
५ बाद २३१ धावसंख्येवरुन पुढे खेळणाऱ्या महाराष्ट्राला तळाच्या फलंदाजांनी तारले. ओदिशाकडून सूर्यकांत प्रधानने सर्वाधिक चार बळी घेतले तर बिपलाब समंतराय याने तीन गडी बाद केले. ओडिशाचीही सुरुवात निराशाजनक झाली होती. पोड्डोरने प्रतीक दास याच्या साथीत ९९ धावांची नाबाद भागीदारी केली व संघाचा डाव सावरला.
मुंडे (३/४०) याच्या प्रभावी माऱ्यापुढे ओदिशाच्या पहिल्या फळीतील फलंदाजांची दाणादाण उडाली. पहिले चार बळी त्यांनी केवळ ६८ धावांमध्ये गमावले. पोड्डोरने शैलीदार खेळ करीत दास याच्या साथीत संघाची घसरगुंडी थोपविली. त्याने १२ चौकारांसह नाबाद ७८ धावा केल्या. दास याने चार चौकारांसह नाबाद ३२ धावा करीत त्याला साथ दिली.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र पहिला डाव १०१.२ षटकांत सर्व बाद २८१ (हर्षद खडीवाले ७४, अंकित बावणे ६०, राहुल त्रिपाठी ४१, सूर्यकांत प्रधान ४/९०, बिपलाब समंतराय ३/३१, बसंत मोहंती २/४१)
ओडिशा पहिला डाव ६७ षटकांत ४ बाद १६७ (गोविंद पोड्डोर खेळत आहे ७८, प्रतीक दास खेळत आहे ३२, श्रीकांत मुंडे ३/४०).