31 May 2020

News Flash

दोन याद्या, दोन पत्रे.. कोणती ग्राह्य ?

जिल्हा संघटना आणि खेळाडूंमध्ये संभ्रमाचे वातावरण

(संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संभाव्य २० खेळाडूंची ‘जुनी यादी आणि नवी यादी’ जशी चर्चेत आहे, तशीच जिल्हा संघटनांना पाठवलेली ‘जुनी पत्रे आणि नवी पत्रे’ चर्चेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा कोणता संभाव्य संघ किवा पत्रे ग्रा मानायची यासंदर्भात राज्यातील कबड्डी क्षेत्रात संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान, एका पदाधिकाऱ्याच्या हस्तक्षेपामुळे एका ठिकाणी पहिल्याच यादीतील खेळाडू कायम ठेवण्यात आल्याचे खात्रीदायक वृत्त आहे.

जयपूर (राजस्थान) २ ते ६ मार्च या कालावधीत होणाऱ्या ६७व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संभाव्य पुरुष आणि महिला खेळाडूंचे शिबीर १७ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत पेझारी (जि. रायगड) येथे होणार आहे. या शिबिरासाठी निवडण्यात आलेल्या मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि पुणे अशा तीन जिल्हा संघटनांच्या खेळाडूंमध्ये अंतर्गत बदल झाल्याचे या यादी आणि पत्रांद्वारे उघडकीस आले आहे. महिलांमध्ये उपनगरच्या सायली जाधवचा एका यादीत, तर कोमल देवकरचा दुसऱ्या यादीत समावेश आहे.

पुरुषांमध्ये एका यादीत आदित्य शिंदे, अजिंक्य पवार वरिष्ठ (दोघेही रत्नागिरी) आणि चेतन पारधे (पुणे) यांचा समावेश आहे, तर दुसऱ्या यादीत शुभम शिंदे आणि रोहन गमरे (दोघेही रत्नागिरी) आणि सुधाकर कदम (पुणे) यांचा समावेश आहे. या याद्या आणि पत्रांमुळे जिल्हा संघटना आणि खेळाडूंमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे सोमवारपासून शिबीर सुरू होईपर्यंत राज्य कबड्डी संघटना हे प्रकरण कसे हाताळते, ते उत्सुकतेचे ठरणार आहे.

सराव शिबिरासाठीचे महाराष्ट्राचे खेळाडू

पुरुष संघ :  यादी क्र. १ : संकेत सावंत, सुशांत साईल, पंकज मोहिते (मुंबई), आकाश कदम (उपनगर), परेश हरड (ठाणे), मयूर कदम, बिपिन थळे (रायगड), स्वप्निल शिंदे, आदित्य शिंदे, अजिंक्य पवार वरिष्ठ, शेखर तटकरे, अजिंक्य पवार कनिष्ठ (रत्नागिरी), मनोज बेंद्रे, चेतन पारधे (पुणे), राहुल धनावडे (अहमदनगर), भागेश भिसे, रोहित बन्न्ो (सांगली), तुषार पाटील (कोल्हापूर), देवेंद्र कदम (धुळे), महारूद्र गर्जे (बीड).

यादी क्र. २ : आदित्य शिंदे (रत्नागिरी), अजिंक्य पवार (रत्नागिरी) यांच्याऐवजी शुभम शिंदे आणि रोहन गमरे (रत्नागिरी), चेतन पारधे (पुणे) ऐवजी सुधाकर कदम (पुणे)

महिला संघ : यादी क्र. १ : पौर्णिमा जेधे, मेघा कदम, पूजा यादव (मुंबई), पूजा जाधव, सायली जाधव, तेजस्विनी पाटेकर (उपनगर), दर्शना सणस, निकीता कदम (ठाणे), रश्मी पाटील (रायगड), समरीन बुरोंडकर (रत्नागिरी), अंकिता जगताप, पूजा शेलार, आम्रपाली गलांडे, श्रद्धा चव्हाण (पुणे), सोनाली हेळवी (सातारा), ऐश्वर्या देशमुख (सांगली), आरती पाटील (कोल्हापूर), ज्योती पवार (नाशिक), ऐश्वर्या काळे (पालघर), सुवर्णा लोखंडे (औरंगाबाद).

यादी क्र. २ : सायली जाधव (उपनगर) ऐवजी कोमल देवकर (उपनगर).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 1:53 am

Web Title: old letters and new letters sent to district unions for national kabaddi tournament abn 97
Next Stories
1 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुंबई विजयापासून वंचित!
2 चालण्याची राष्ट्रीय स्पर्धा : भावना जाट ऑलिम्पिकसाठी पात्र
3 समस्यांच्या चक्रव्यूहात मुंबईचे क्रिकेट
Just Now!
X