भारताची थाळीफेकपटू कृष्णा पुनिया हिला ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कार मिळावा अशी मागणी करणाऱ्या खेळाडूंमध्ये वाढ होत असून, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त याच्यासह अनेक नामवंत खेळाडूंनी तिच्या मागणीला पाठिंबा व्यक्त केला आहे.
खेलरत्न पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय नेमबाज रंजन सोधीच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. आपली कामगिरी त्याच्यापेक्षा जास्त चांगली आहे, असा दावा करीत पुनिया हिने आपल्याला हा पुरस्कार मिळावा अशी मागणी केली असून, तिने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे धाव घेतली आहे. ‘‘हा पुरस्कार मिळविण्यासाठी ती योग्य खेळाडू आहे. तिला हा पुरस्कार मिळावा यासाठी संपूर्ण कुस्ती क्षेत्र तिच्या पाठीशी आहे,’’ असे योगेश्वर दत्त याने सांगितले.
ऑलिम्पिक पदकविजेता सुशील कुमार, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक यशबीर सिंग, प्रशिक्षक यशपाल सोळंकी तिला पाठिंबा दर्शविला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 19, 2013 4:22 am