21 September 2020

News Flash

सक्तीच्या विश्रांतीमुळे कुस्तीपटूंना ऑलिम्पिक पात्रता आव्हानात्मक!

कुस्तीपटू बजरंग पुनियाचे मत

संग्रहित छायाचित्र

 

करोनाच्या साथीमुळे स्पर्धाचा कालावधी निघून गेला आहे. आता सक्तीच्या विश्रांतीमुळे पात्र न ठरणाऱ्या कुस्तीपटूंना टोक्यो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित करणे आव्हानात्मक जाणार आहे, असे मत भारताचा अव्वल कुस्तीगीर बजरंग पुनियाने व्यक्त केले.

‘‘माझ्यासारख्या अव्वल कुस्तीपटूंनी ऑलिम्पिकचे स्थान आधीच निश्चित केल्यामुळे आमचे ध्येय आणि मानसिक दृष्टिकोन पक्का झाला आहे. जगातील सर्वोच्च प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करायची, हे आम्ही आधीच ठरवून सरावाला सुरुवात केली आहे. पण अद्याप ज्यांना ऑलिम्पिकसाठी पात्र ठरता आलेले नाही, त्यांच्यासाठी पुढील काळ आव्हानात्मक असणार आहे,’’ असे बजरंगने सांगितले.

ऑलिम्पिकच्या तयारीबाबत बजरंग म्हणाला की, ‘‘माझी कामगिरी खराब होणार नाही, असे मी सांगणार नाही. कारण गेल्या चार-पाच महिन्यांपासून एकही स्पर्धा झालेली नाही. सर्वच जण टाळेबंदीमुळे आपल्या घरात कोंडले आहेत. पण मी एकही दिवस सराव चुकवलेला नाही. माझ्यासोबत असणाऱ्या साहाय्यक मार्गदर्शकांवर मी अवलंबून आहे, कारण ते तुम्हाला कितपत प्रोत्साहित करतात, यावर तुमची मानसिक कणखरता अवलंबून आहे. सुदैवाने माझ्यासोबत चांगले लोक आहेत.’’

भारताकडून आतापर्यंत बंजरंगसह (६५ किलो), दीपक पुनिया (८६ किलो), रवि दहिया (५७ किलो) आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगट (५३ किलो) या चार कुस्तीपटूंनी टोक्यो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान पक्के केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 12:14 am

Web Title: olympic qualification challenging for wrestlers due to forced rest wrestler bajrang punia abn 97
Next Stories
1 गावस्कर यांच्या विशेष सत्काराचा मुद्दा ‘एमसीए’च्या बैठकीत
2 चॅम्पियन्स लीग फुटबॉल : लेपझिग प्रथमच उपांत्य फेरीत
3 १० सेकंदाच्या जाहीरातीसाठी १० लाख ! IPL प्रक्षेपण करणाऱ्या Star Sports ने आखलाय मेगाप्लान
Just Now!
X