‘विस्डेन’चे पुरस्कार,

‘आयसीसी’ क्रमवारीतील भारतीय क्रिकेटपटूंचे वर्चस्व आणि बॉक्सिंगमधील मेरी कोम-निखत झरीन यांच्यातील संघर्षांसह सरत्या वर्षांला निरोप देताना क्रीडापटूंसह तमाम चाहत्यांना आता आगामी २०२० या वर्षांतील नव्या आव्हानांचे वेध लागले आहेत. पुरुष आणि महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाप्रमाणेच टोक्यो ऑलिम्पिक, १९ वर्षांखालील विश्वचषक आणि युरो विश्वचषक फुटबॉल अशा स्पर्धामुळे यंदाचे वर्ष चाहत्यांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आगामी वर्षांतील काही निवडक, पण महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धाचा घेतलेला हा आढावा-

युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा (१९ वर्षांखालील) : १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी (दक्षिण आफ्रिका)

महिलांची ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : २१ फेब्रुवारी ते ८ मार्च (ऑस्ट्रेलिया)

पुरुषांची ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर (ऑस्ट्रेलिया)

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) : २९ मार्चपासून सुरुवात (संपूर्ण वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही)

  • ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा :  २४ जुलै ते ९ ऑगस्ट (टोक्यो)
  • पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा : २५ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर (टोक्यो)

युरो चषक फुटबॉल स्पर्धा : १२ जून ते १२ जुलै (युरोप खंडातील १२ देशांमध्ये सामन्यांचे आयोजन)

ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा : ’ऑस्ट्रेलियन खुली :  २० जानेवारी ते २ फेब्रुवारी

  • फ्रेंच खुली : २४ मे ते ७ जून
  • विम्बल्डन खुली : २९ जून ते १२ जुलै
  • अमेरिकन खुली : ३१ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर

जागतिक बॅडमिंटन मालिकेचा अंतिम टप्पा : ७ डिसेंबरपासून  सुरुवात (चीन)

नेमबाजी : वर्षभरात एकूण चार विश्वचषक (पिस्तूल, रायफल आणि अन्य प्रकार)

आशियाई सागरी- किनारी क्रीडा स्पर्धा : २६ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर (चीन)

खेलो इंडिया  युवा क्रीडा स्पर्धा : ९ ते २२ जानेवारी (गुवाहाटी)

प्रो कबड्डी लीगचा  (आठवा हंगाम) : जुलै ते ऑक्टोबर

अल्टिमेट खो-खो लीग (पहिले पर्व) : ८ ते २९ मार्च

आशियाई अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : २८ ते ३१ जानेवारी (नवी दिल्ली)

जागतिक अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : १६ ते २० सप्टेंबर (मलेशिया)

जागतिक  अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा : ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात

’प्रो हॉकी लीग (पुरुष) : १८ जानेवारी  ते २८ जून

’प्रो हॉकी लीग (महिला) : ११ जानेवारी ते २१ जून

जागतिक अजिंक्यपद स्नूकर स्पर्धा : १८ एप्रिल ते ४ मे इंग्लंड

जागतिक अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा : २२ ते २९ मार्च (कोरिया)

टूर डी फ्रान्स (सायकल शर्यत) : २७ जून ते १९ जुलै (फ्रान्स)

भारतीय क्रिकेट संघाच्या अन्य महत्त्वाच्या मालिका

  • श्रीलंकेविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिका : ५ ते १० जानेवारी
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका : १४ ते १९ जानेवारी
  • भारताचा न्यूझीलंड  दौरा (पाच ट्वेन्टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने) : २४ जानेवारी ते ४ मार्च
  • आशिया चषक : (तारीख अद्याप ठरलेली नाही)
  • इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिका) : सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यांदरम्यान
  • भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (चार कसोटी, तीन ट्वेन्टी-२० सामने) : नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यांदरम्यान

संकलन : ऋषिकेश बामणे