News Flash

Women’s Boxing Semifinals : किती वाजता आणि कुठे Live पाहता येणार भारताच्या लव्हलिनाचा सामना?

विधानसभेच्या आमदारांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच उत्सुकता असणारा हा सामना कधी कुठे कसा पाहता येणार?

Lovlina Borgohain vs Busenaz Surmeneli Live Boxing semifinals Match
आसामच्या २३ वर्षीय लव्हलिनाने उपउपांत्यपूर्व लढतीत जर्मनीच्या नॅडिन अपेट्झला ३-२ असे नमवले. (फोटो ऑलिम्पिक डॉट कॉमवरुन साभार)

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आज एक ऐतिहासिक सामना होणार आहे. यापूर्वीच पदकनिश्चिती केलेली भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन आज इतिहास रचण्याच्या निर्धाराने रिंगणात उतरेल. महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लवलिनासमोर जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मेनेलीचे कडवे आव्हान असून ही लढत जिंकल्यास ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कोणत्याही वजनी गटाची अंतिम फेरी गाठणारी भारताची पहिली बॉक्सिंगपटू ठरण्याची लव्हलिनाला संधी आहे. मात्र आसाम विधानसभेच्या आमदारांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच उत्सुकता असणारा हा सामना कधी कुठे कसा पाहता येणार आहे हे अनेकांना ठाऊक नाही त्यावरच टाकलेली नजर…

नक्की पाहा हे फोटो >> वडिलांनी मिठाई गुंडाळून आणलेल्या पेपरने तिचं आयुष्य बदललं; लव्हलिनाचा प्रेरणादायी प्रवास

आसामच्या २३ वर्षीय लव्हलिनाने उपउपांत्यपूर्व लढतीत जर्मनीच्या नॅडिन अपेट्झला ३-२ असे नमवले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपईच्या नीन-शेन चेनला ४-१ अशी धूळ चारून तिने पदक पक्के केले. विजेंदर सिंग आणि एम. सी. मेरी कोम यांच्यानंतर पदक जिंकणारी ती भारताची तिसरी बॉक्सिंगपटू ठरली आहे. मात्र लव्हलिनाने सुवर्णपदकासहच माघारी परतण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे. २०१९ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत बुसेनाझने सुवर्ण मिळवले होते, तर लव्हलिना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र यंदा लव्हलिना ही कसर भरुन काढण्याच्या निर्धारानेच बाऊटमध्ये पाऊल ठेवेल यात शंका नाही. जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मेनेलीविरोधातील हा सामना आज कोकू गिकान अरेनामध्ये पार पडणार आहे.

नक्की वाचा >> Tokyo Olympics 2020 Women’s Hockey: कधी, कुठे आणि कसा पाहता येणार भारत विरुद्ध अर्जेंटिना सामना?

कधी आहे सामना :

भारताची लव्हलिना बोर्गोहाइन विरुद्ध टर्कीची बुसेनाझ सुर्मेनेली आज अंतिम फेरीमध्ये प्रवेशासाठी लढणार असून हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजता सुरु होणार आहे.

नक्की वाचा >> ऑलिम्पिक भालाफेक स्पर्धा : पहिल्याच प्रयत्नात नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक; पदकाच्या अपेक्षा वाढल्या

कुठे खेळवला जाणार हा सामना :

लव्हलिना आणि बुसेनाझदरम्यानचा हा सामना कोकू गिकान अरेनामध्ये खेळवला जाणार आहे. टोक्यो शहरातील २३ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये हे इनडोअर स्टेडियम आहे.

कुठे पाहता येणार :

सोनी टेन १ एचडी/एसडी, सोनी टेन २ एचडी/एसडी आणि सोनी टेन ३ एचडी/एसडी या वाहिन्यांवर हा सामना लाइव्ह पाहता येईल.

नक्की पाहा हे फोटो >> भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकांचं एका महिन्याचं मानधन पाहून चक्रावून जाल

ऑनलाइन कुठे पाहता येणार सामना :

हा सामना ऑनलाइन माध्यमातून सोनी लिव्ह अ‍ॅपवर पाहता येणार आहे. तसेच सामन्याचे सर्व अपडेट्स loksatta.com वरही उपलब्ध असतील.

सामन्याआधी लव्हलिना काय म्हणाली?

बुसेनाझविरुद्ध मी प्रथमच झुंज देणार असली तरी तिची बलस्थाने आणि कच्चे दुवे मला माहीत आहेत. माझे पदकनिश्चित झाले आहे. मात्र मला सुवर्णपदक जिंकूनच मायदेशी परतायचे आहे. त्यामुळे बुसेनाझला नमवून अंतिम फेरी गाठण्यासाठी सर्वस्व पणाला लावेन, असं सामन्याआधी बोलताना लव्हलिनाने सांगितलं आहे.

नक्की पाहा हे फोटो >> “सरकार त्याचं लग्न होऊ देणार नाही”; ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूच्या आईला मुलाच्या संसाराची चिंता

विधानसभाही तहकूब होणार…

लव्हलिनाचा सामना पाहण्यासाठी आसामच्या विधानसभेचं कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती आसाम सरकारमधील मंत्री पिजुष हजारिका यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिलीय. पिजुष हजारिका यांनी यासंदर्भात एएनआयला माहिती देताना विधानसभेचं कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब करुन सर्व आमदार सामना पाहणार असल्याचं स्पष्ट केलं. “आसामच्या विधानसभेचं कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात येईल. सभागृहातील सर्व आमदार भारताची लव्हलिना बोर्गोहाइन आणि तर्कीच्या बुसेनाझ सुर्मेनेलीदरम्यानचा महिला बॉक्सिंग स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना पाहणार आहेत,” असं हजारिका म्हणाले.

आतापर्यंत वेटलिफ्टींगपटू मिराबाई चानूने पटाकवलेलं रौप्य पदक, बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधूच्या कांस्यपदकासहीत भारताने दोन पदकं जिंकली असून लव्हलिनाचंही पदक निश्चित आहे. मात्र लव्हलिनाने सुवर्णपदकच जिंकावे अशी सर्वच भारतीयांची इच्छा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2021 9:35 am

Web Title: olympics lovlina borgohain vs busenaz surmeneli live boxing semifinals match when and where to watch scsg 91
टॅग : Tokyo Olympics 2020
Next Stories
1 Olympics 2020 : तिचा सामना पाहण्यासाठी विधानसभा २० मिनिटांसाठी तहकूब करुन सर्व आमदार सामना पाहणार
2 Tokyo Olympics 2020 Women’s Hockey: कधी, कुठे आणि कसा पाहता येणार भारत विरुद्ध अर्जेंटिना सामना?
3 ऑलिम्पिक भालाफेक स्पर्धा : पहिल्याच प्रयत्नात नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक; पदकाच्या अपेक्षा वाढल्या
Just Now!
X