करोनामुळे वर्षभर लांबणीवर टाकण्यात आलेली टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पुढील वर्षीच खेळवून विश्वाने एकप्रकारे करोनावर विजय मिळवल्याचे यातून सिद्ध करावे, अशी प्रतिक्रिया टोक्योच्या राज्यपाल युरीको कोईक यांनी व्यक्त केली.

‘‘टोक्यो ऑलिम्पिकचे पुढील वर्षीच आयोजन करण्यात यावे. करोनामुळे क्रीडा क्षेत्र विखुरले गेले आहे. ऑलिम्पिकच्या आयोजनाद्वारे आपण करोनाला नमवण्यात यशस्वी झालो आहे, हे सिद्ध करू शकतो. यामुळे क्रीडा क्षेत्रालाही चालना मिळेल,’’ असे युरीको म्हणाल्या.