News Flash

मॅच फिक्सिंग : ICC कडून क्रिकेटपटूवर ७ वर्षांची बंदी

क्रिकेटपटूने मान्य केले आरोप

संग्रहित

टी २० विश्वचषक स्पर्धांसाठी घेण्यात आलेल्या पात्रता सामन्यांदरम्यान मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी ओमान संघाच्या युसूफ अब्दुलरहिम अल बलुशी याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. ICC ने सोमवारी या संदर्भातील माहिती दिली. अल बलुशी याने आपल्यावरील चार आरोप मान्य केले. दुबईत गेल्या वर्षी टी २० विश्वचषक स्पर्धांसाठीचे पात्रता सामने खेळवण्यात आले होते. त्या सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंग करण्याबाबत चार आरोप त्याने मान्य केले. त्यानंतर त्याच्यावर ७ वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली.

२९ वर्षांच्या अल बलुशी याने टी २० विश्वचषक स्पर्धांसाठी खेळवण्यात आलेल्या पात्रता सामन्यांत त्याने मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केला आणि आपल्या संघातील सहकाऱ्यांनादेखील मॅच फिक्सिंगसाठी मदत करण्यास सांगितले. या वर्तणुकीमुळे ICC ने त्याच्यावर ७ वर्षांची बंदी घातली.

“मॅच फिक्सिंग हा खूपच गंभीर गुन्हा आहे. अल बलुशीने संघातील सहकाऱ्यांना या गुन्ह्यात ओढण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला. इतक्या मोठ्या स्तरावरील सामने आयोजित करण्यात आले असताना अशा प्रकारे चुकीचे वर्तन केल्यामुळेच त्याला कठोर शासन करण्यात आले आहे. बलुशीने गुन्हा कबूल केला आणि तपासात पूर्णपणे सहकार्य केलं म्हणून त्याच्यावर केवळ ७ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणात काही वेळा मोठी शिक्षादेखील होऊ शकली असती. मॅच फिक्सिंग करणाऱ्यांना नियमावलीनुसार आजीवन क्रिकेट बंदीचीही तरतूद आहे”, असे ICC चे वरिष्ठ अधिकारी अॅलेक्स मार्शल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 3:04 pm

Web Title: oman cricketer al balushi gets seven year ban for match fixing vjb 91
टॅग : Cricket News
Next Stories
1 Video : स्मिथची ‘हवाई फिल्डिंग’! सीमारेषेवर षटकार जात असताना काय केलं पाहा…
2 Ind vs NZ : या संघाला पॅसिफिक महासागरात बुडवायला हवं !
3 Video : …अवघे धरु सुपंथ! हा भन्नाट झेल एकदा पाहाच…
Just Now!
X