12 December 2017

News Flash

ठरलेल्या दौऱ्यापूर्वीच भारतीय कसोटी संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल होणार

दक्षिण आफ्रिका दौऱयासाठी भारतीय कसोटी संघात निवड झालेल्या काही क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने

पीटीआय | Updated: November 30, 2013 2:24 AM

दक्षिण आफ्रिका दौऱयासाठी भारतीय कसोटी संघात निवड झालेल्या काही क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दौऱ्यापूर्वीच तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी लवकर पाठविण्याचा निर्णय  घेतला आहे.
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने बीसीसीआयला केलेल्या विनंतीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यांआधी एकदिवसीय सामने होणार आहेत. त्याचवेळी कसोटी संघात निवड झालेल्या जहीर खानला ही दक्षिण आफ्रिकेत पाठवावे. त्यामुळे कसोटी संघातील खेळाडूंना ही तेथील वातावरणाशी जुळवून घेता येईल. याची भेदक गोलंदाजीला मदत होईल असे धोनीने म्हटले.
यानुसार  आता भारतीय कसोटी संघात निवड झालेले झहीर खान, मुरली विजर, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा आणि प्रग्यान ओझा हे लवकर दक्षिण आफ्रिकेला जाणार आहेत. तसा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. येत्या ५ डिसेंबर पासून एकदिवसीय मालिकेला सुरूवात होत आहे. तर, १८ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे.

First Published on November 30, 2013 2:24 am

Web Title: on ms dhonis call mentor zaheer khan to fly out early to help pacers