News Flash

..हाच तो दिवस, कुंबळेने पाकच्या संपूर्ण संघाला केलं होतं गारद

कुंबळेने पाकच्या संपूर्ण संघाला गारद करून भारतीय संघाला विजय प्राप्त करून दिला

७ फेब्रुवारी १९९९ रोजी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर भारताचे माजी फिरकीपटू आणि सध्याच्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी अनोखा पराक्रम केला होता. कुंबळे यांनी पाकिस्तान विरुद्धच्या कसोटीमध्ये एकाच इनिंगमध्ये दहा विकेट्स घेण्याची किमया केली होती. एकाच इनिंगमध्ये दहा विकेट्स घेण्याचा विक्रम करणारे कुंबळे हे दुसरे गोलंदाज ठरला होता. याआधी हा पराक्रम इंग्लंडच्या जिम लाकेर यांच्या नावावर होता.

भारतीय संघाने पाकिस्तानसमोर विजयासाठी ४२० धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले होते. त्यामुळे पाकिस्तानचा सामना ड्रॉ करण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेरच्या दिवशी पाकचे फलंदाज खेळपट्टीवर टीच्चून फलंदाजी करून सामना ड्रॉ होईल याची काळजी घेत होते. मग अनिल कुंबळने पाकच्या फलंदाजांना आपल्या फिरकी जाळ्यात ओढून ७४ धावांमध्ये १० विकेट्स घेतल्या होत्या आणि भारताने सामना खिशात टाकला होता.

kumble

पाकिस्तानच्या संघाची सुरूवात चांगली झाली होती. सलामी जोडीने शतकी भागीदारी रचली होती. मग कुंबळने आपली जादू दाखवण्यास सुरूवात केली. शाहीद आफ्रिदी सलामीला उतरला होता. कुंबळेने आफ्रिदीची(४१) पहिली विकेट घेतली. यष्टीरक्षक नयन मोंगियाने कुंबळेच्या फिरकीवर आफ्रिदीचा झेल टीपला. आफ्रिदीनंतर इझाज आणि इंझमाम-उल-हक यांची दांडी कुंबळेने गुल केली. मग सईद अन्वर याने विकेट टाकल्यानंतर पाकिस्तानचा संघ पेचात सापडला. कुंबळेने पाकच्या फलंदाजांवर दबाव निर्मितीकरून त्यांना चांगलेच जखडून ठेवले. मोहम्मद युसूफ आणि अहमद यांना तर शून्यावर माघारी धाडण्यात आले. तर वसिम अक्रम आणि सलिम मलिक यांनी खेळपट्टीवर उभे राहून सामना ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला. ही जोडी देखील कुंबळेने फोडून काढली.

पाहा व्हिडीओ –


कुंबळेने पाकच्या संपूर्ण संघाला गारद करून भारतीय संघाला विजय प्राप्त करून दिला. पाकिस्तानचा दुसरा डाव २०७ धावांमध्ये संपुष्टात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 10:45 am

Web Title: on this day in 1999 anilkumble became just the second bowler to take all 10 wickets in a test innings nck 90
Next Stories
1 जो रुटचा द्वशतकी दणका; इंग्लंडचा ५७८ धावांचा डोंगर
2 श्रेयस अय्यरचा निर्णय १० फेब्रुवारीला
3 हजारे क्रिकेट स्पर्धा २० फेब्रुवारीपासून
Just Now!
X