06 March 2021

News Flash

महेंद्रसिंह धोनीसाठी आजचा दिवस आहे खास, जाणून घ्या कारण…

पाकिस्तानी गोलंदाजांची केली होती धुलाई

इंग्लंडमध्ये पार पडलेल्या २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. न्यूझीलंडने भारतावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यानंतर भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने आपलं संघातलं स्थान गमावलं आहे. या सामन्यापासून आतापर्यंत धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अनेकदा धोनीच्या निवृत्तीबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत असते, मात्र धोनीने अद्याप अधिकृतपणे कोणतीही गोष्ट जाहीर केली नाही. मात्र धोनीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ एप्रिल हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आजच्या दिवशी २००५ साली धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं पहिलं शतक झळकावलं होतं.

विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळत असताना धोनीने पाकिस्तानविरुद्ध वन-डे सामन्यात पहिल्या शतकाची नोंद केली होती. धोनीने १२३ चेंडूत १५ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने १४८ धावांची खेळी केली. या सामन्यात धोनीला विरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांनी मोलाची साथ दिली. पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेताना भारताने या सामन्यात ९ गड्यांच्या मोबदल्यात ३५६ धावांचा डोंगर उभा केला.

यानंतर गोलंदाजीतही भारतीय गोलंदाजांनी कमाल करत पाकिस्तानला २९८ धावांत रोखत सामन्यात विजय मिळवला. आशिष नेहराने या सामन्यात ४ बळी घेतले होते. आतापर्यंत धोनीने ३५० सामन्यातं भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं असून श्रीलंकेविरुद्ध १८३ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. आगामी काळात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ साली टी-२० विश्वचषक, २०११ साली वन-डे विश्वचषक आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी या ३ महत्वाच्या स्पर्धांचं विजेतेपद पटकावलं होतं. आयपीएलमध्येही धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्ज संघाने ३ वेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.

अवश्य वाचा – निवृत्तीबद्दल विचारल्यावर धोनीला राग येतो, जवळच्या मित्राने दिली माहिती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 11:46 am

Web Title: on this day in 2005 ms dhoni scored his first international century psd 91
टॅग : Dhoni
Next Stories
1 माणसं जगली तरच क्रिकेट खेळण्याला अर्थ – नवदीप सैनी
2 करोनाशी लढा : लॉकडाऊन काळात दहा हजार लोकांच्या जेवणाची जबाबदारी ‘दादा’कडे
3 सध्या लोकांचा जीव महत्वाचा, आयपीएल नंतर खेळवलं जाऊ शकतं – सुरेश रैना
Just Now!
X