News Flash

दे दणादण! आजच ‘हिटमॅन’ने मारला होता शतकी ‘पंच’

World Cup च्या इतिहासात अशी कामगिरी करणारा रोहित एकमेव!

भारतीय संघाचा निर्धारित षटकांच्या सामन्यांचा उपकर्णधार रोहित शर्मा हा सध्याच्या घडीला सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक आहे. रोहित शर्माने भारतासाठी अनेक उपयुक्त खेळी केल्या आहेत. त्यापैकी विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये त्याने केलेली कामगिरी अफलातून होती. रोहितने त्या स्पर्धेत तब्बल पाच शतकं ठोकली होती. कोणत्याही खेळाडूने एका विश्वचषक स्पर्धेत अद्याप हा कारनामा केला नव्हता. अजूनही World Cupच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा रोहित एकमेव फलंदाज आहे. त्यातील पाचवे शतक रोहितने आजच्याच दिवशी ठोकले होते.

विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने शतक ठोकले होते. या स्पर्धेतील हे रोहितचे पाचवे शतक ठरले होते. त्या आधी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नाबाद १२२ , पाकिस्तानविरूद्ध १४० , इंग्लंडविरूद्ध १०२ आणि बांगलादेशविरूद्ध १०४ धावांची शतकी खेळी केली होती. मात्र श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात त्याने ठोकलेले शतक विशेष ठरले होते. श्रीलंकेविरूद्ध त्याने १०३ धावांची खेळी केली होती. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत ५ शतके ठोकणारा जगातील पहिला फलंदाज होण्याचा बहुमान रोहितने पटकावला होता.

रोहितने विश्वचषक स्पर्धेत एकूण ९ सामने खेळले. त्या सामन्यात त्याने ९८ च्या स्ट्राईक रेटने आणि ८१ च्या सरासरीने ६४८ धावा ठोकल्या होत्या. या ६४८ धावांमध्ये पाच शतके आणि एक अर्धशतक सामील होते. त्याने सर्वोत्तम १४० धावांची खेळी करून दाखवली होती. पण, दुर्दैवाने भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. न्यूझीलंड संघाने भारताला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली होती.

अंतिम फेरीत मात्र न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामना अनिर्णित राहिल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्यात देखील सामन्याचा निकाल लागला नव्हता, अखेर चौकार-षटकारांच्या संख्येवर इंग्लंड विश्वविजेता बनला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 3:51 pm

Web Title: on this day rohit sharma first ever batsman to score five centuries in single edition of odi cricket world cup 2019 superb record vjb 91
Next Stories
1 राहुल द्रविड होता भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा मुख्य दावेदार, पण…
2 नासीर हुसेनच्या मते कर्णधार विराट कोहलीत आहे ‘हा’ दोष…
3 माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणतो, पाकिस्तानचा संघ भारताला त्यांच्यात देशात हरवू शकतो !
Just Now!
X