20 September 2020

News Flash

WC 2019 Flashback : ‘हिटमॅन’चा शतकांचा चौकार अन बांगलादेश स्पर्धेबाहेर

रोहित ठरला होता असा पराक्रम करणारा पहिला भारतीय

करोनाच्या दणक्यामुळे सध्या क्रिकेट स्पर्धा बंद आहेत. ८ जुलैपासून इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. पण गेल्या वर्षी आजच्या दिवशी विश्वचषकाची धूम सुरू होती. इतकेच नव्हे तर मुंबईच्या हिटमॅनने धडाकेबाज कामगिरी करत बांगलादेशच्या संघाला स्पर्धेबाहेर फेकले होते. बांगलादेशवरील विजयासह भारतीय संघाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. भारताने बांगलादेशवर २८ धावांनी विजय मिळवला होता. रोहित शर्माने या सामन्यात स्पर्धेतील चौथे शतक ठोकले होते. एका विश्वचषक स्पर्धेत चार शतके ठोकणारा रोहित पहिला भारतीय फलंदाज ठरला होता. त्याने श्रीलंकेच्या कुमार संगाकाराशी बरोबरी केली होती. तसेच गांगुलीचा विश्वचषकात तीन शतकांचा विक्रम मोडला होता.

असा रंगला होता सामना

भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित शर्माचे शतक (१०४), लोकश राहुलचे अर्धशतक (७७) आणि ऋषभ पंतच्या (४८) धावांच्या बळावर भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी ३१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. रोहित शर्मा आणि लोकश राहुल खेळपट्टीवर असताना भारत यापेक्षाही मोठी धावसंख्या उभारेल असे वाटले होते. पण रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मोठी भागीदारी होऊ शकली नाही. रोहितने मोठया धावसंख्येचा पाया रचला होता. पण अन्य फलंदाजांना त्यावर कळस चढवता आला नाही. मुस्ताफिझूर रहमानच्या बांगलादेशकडून यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १० षटकात ५९ धावांमध्ये भारताचा निम्मा संघ तंबूत पाठवला.

बांगलादेशला विजयासाठी मिळालेले ३१५ धावांचे आव्हान पेलवले नाही. अनुभवी शाकिब अल हसनने दमदार अर्धशतक ठोकले. त्याने ६६ धावा केल्या. त्याला इतर फलंदाजांनी साथ मिळाली नाही. खालच्या फळीतील सैफुद्दीनने नाबाद ५१ धावांची खेळी करत सामना रंगतदार अवस्थेत नेला, पण बुमराहने ४८ व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर बांगलादेशच्या दोन फलंदाजांना एकापाठोपाठ त्रिफळाचीत करत तंबूत धाडत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने बांगलादेशचा डाव २८६ धावांवर गुंडाळला आणि २८ धावांनी विजय मिळवला. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४, पांड्याने ३ तर चहल, शमी आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी एक बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 11:44 am

Web Title: on this day team india rohit sharma 4th century in world cup 2019 kicked bangladesh out of tournament vjb 91
Next Stories
1 कॅरेबियन क्रिकेटचे पितामह एव्हर्टन वीक्स यांचं ९५व्या वर्षी निधन
2 ‘व्हिवो’च्या कराराबाबत निर्णय अद्याप प्रलंबित!
3 ‘आयसीसी’च्या कार्याध्यक्षपदावरून शशांक मनोहर पायउतार
Just Now!
X