आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज सोमवार एक सट्टेबाजाला अटक केली. चंद्रेश जैन उर्फ ज्युपिटर असे या सट्टेबादाचे नाव असून त्याला जयपूर येथे अटक करण्यात आली आहे.
त्याला जयपूर येथील जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. जैन याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आयपीएलमधील फिक्सिंगप्रकरणी आतापर्यंत दिल्ली पोलिसांनी केलेली ही ३०वी अटक असल्याचे विशेष पोलीस आयुक्त एस.एन.श्रीवास्तव यांनी सांगितले.