करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्व देशभरात क्रीडा स्पर्धा बंद आहेत. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूही सध्या लॉकडाउन काळात घरातच आहेत. केंद्र सरकारने लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मैदानं आणि Sports Complex उघण्याची परवानगी दिली आहे. मात्र खेळाडूंना सराव करण्याची परवानगी अद्याप बीसीसीआयने दिली नाहीये. असं असलं तरीही भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने सरावाला सुरुवात केली आहे.

शमीने आपल्या घरात, बॅटिंग करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्याने आपल्या चाहत्यांना इनडोअर क्रिकेटचे नियम काय असतात असं विचारलं आहे. शमीने आपल्या घरीच, एका मोकळ्या जागेत फलंदाजीचा सराव केला.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. यंदाची स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस स्पर्धेचं आयोजन करता येतं का याची चाचपणी बीसीसीआय करत आहे.