‘युनाईटेड अरब इमरटीज्’च्या १९९३ साली झालेल्या क्रिकेट मालिकांमध्ये श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान सामन्यात मला मॅच फिक्सिंगसाठी १०,००० पाऊंड देऊ करण्याचा प्रयत्न एका बुकीने केला होता असा गौप्यस्फोट आंतराष्ट्रीय क्रिकेटचे माजी पंच जोहन होल्डर यांनी केलाय. “सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजाची ८५ धावांची भागिदारी होईपर्यंत शांतता बाळल्यास(फलंदाज बाद होऊ न दिल्यास) तुला १०,००० पाऊंड रोख मिळतील” असा एक निनावी फोन आला होता असे होल्डर यांनी बीबीसी आकाशवाणीच्या एका खास कार्यक्रमात म्हटले. त्यावेळी “तु अयोग्य व्यक्तीशी संपर्क साधला आहेस. असे प्रत्युत्तर मी दिले दिले” असेही होल्डर पुढे म्हणाले. सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणावरुन होल्डर यांना त्यांना कधी फिक्सिंगसाठी संपर्क केला होता का? याप्रश्नावर होल्डर यांनी ही प्रतिक्रीया दिली.  
जोहन होल्डर हे १९८३ साली फर्स्ट-क्लास पंचांच्या क्षेणीत होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत १९८८ ते २००१ दरम्यान, ११ कसोटी आणि १९ एकदिवसीय सामन्यांसाठी पंच म्हणून कामगिरी पाहीली आहे.