News Flash

IND vs ENG : क्रिकेटचा नादच खुळा! लग्नाच्या दिवशीही आवरला नाही सामना बघण्याचा मोह

चेन्नईमधील या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

भारतामध्ये एकापेक्षा एक क्रिकेटवेडे चाहते आहेत. टीम इंडियाचा सामना असल्यास हातातील काम बाजूला ठेवून क्रिकेटचा आनंद घेत असतात. असाच काहीसा प्रसंग चेन्नईमध्ये एका लग्नात घडला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटीम्यान एका क्रिकेटवेड्या चाहत्यानं लग्नामध्ये सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण लावलं होतं. यावरुन भारतामध्ये क्रिकेटचं वेड कितपत आहे याचा अंदाज बांधला जाईल.

चेन्नईमधील या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. लग्नामध्ये क्रिकेटचा सामना पाहण्याचा मोह उपस्थित पाहुण्यांनाही आवरला नसल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भातील एक फोटो ट्विटरवर व्हायरल झाला असून यामध्ये लग्नातील पाहुणेमंडळी कसोटी सामन्याचा आनंद घेत असताना दिसून येत आहेत. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांचं विधीकडे लक्ष नव्हतं, सामना पाहण्यात ते दंग होते.

पाहा व्हायरल ट्विट –


अक्षय नटराजन नावाच्या युजरने हा फोटो शेअर केला असून याला शानदार कॅप्शन दिलं आहे. चेन्नईचे खेळाडू फलंदाजी करत आहेत. यामध्ये तुम्ही स्वतःला सामना बघण्यापासून कसं रोखू शकता. हॅप्पी मॅरीड लाईफ आनंद दा, असं कॅप्शन दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 3:21 pm

Web Title: only in india family live streams ind vs eng test match at wedding venue picture goes viral nck 90
टॅग : India Vs England
Next Stories
1 मजूराच्या मुलीने मोडला चालण्याचा विक्रम
2 ओए मेनन; कोहलीची अंपायरकडे केलेली तक्रार व्हायरल
3 IND vs ENG : पराभवानंतर विराट कोहलीचा इंग्लंडला इशारा, म्हणाला….
Just Now!
X