News Flash

सचिनसाठी आजची तारिख आहे खास; जाणून घ्या का?

सचिनची अष्टपैलू कामगिरी

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनं आजच्या दिवशी पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. ५ डिसेंबर १९९० रोजी अवघ्या १७ वर्षाच्या सचिननं आपल्या खेळीतील चुणूक दाखवली होती. सचिनला पहिलं अर्धशतक झळकावण्यासाठी वर्ष लागलं होतं. १८ डिसेंबर १९८९ रोजी सचिनने एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं होतं. त्यानंतर जवळपास वर्षभरानं सचिनने पहिलं अर्धशतक झळकलं.

१९९०-९१ मध्ये श्रीलंकेचा अनुभवी संघ भारत दौऱ्यावर आला होता. भारतीय संघाची कमान अझहरच्या हातात होती. सलामीची जबाबदारी तेव्हा सिद्धू आणि रवी शास्त्री यांच्याकडे होती. श्रीलंकेनं दिलेलं २२८ धावांचं आवाहन पार करताना सिद्धू-शास्त्री या जोडीनं भन्नाट सुरुवात करुन दिली होती. याचाच फायदा घेत मधल्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या युवा सचिन तेंडुलकरनं झंझावाती अर्धशतकी खेळी केली. सचिनं तेंडुलकरचं हे आपल्या कारकिर्दितीतल पहिलं अर्धशतक होय. त्यावेळी सचिन मधल्या फळीत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत होता.

सचिन तेंडुलकरनं अवघ्या ४१ चेंडूत ५१ धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळीदरम्यान सात खणखणीत चौकार आणि एक षटकारही लगावला होता. इतकेच नाही तर गोलंदाजीतही सचिनने कमाल केली होती. सचिनने ९ षटकात ३९ धावांच्या मोबदल्यात महत्वाच्या दोन विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीमुळे सचिनला सामनाविर पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. एकदिवसीय क्रिकेटमधील सचिनाचा हा पहिला सामनाविर पुरस्कार होता… त्यामुळेच सचिनसाठी आजचा दिवस खास आहे. आयसीसीनेही आजच्या दिवसाची आणि सचिनच्या त्या खेळीची आठवण करुन दिली आहे…


तीन दशकांपूर्वी १५ नोव्हेंबर १९८९ रोजी क्रिकेटच्या देवानं म्हणजेच सचिन तेंडुलकरनं पाकिस्तानविरोधात वयाच्या १६व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. २०० कसोटी सामने खेळणारा सचिन तेंडुलकर एकमेव खेळाडू आहे. सचिनने २०० कसोटी सामन्यात ५१ शतकांच्या मदतीनं १५ हजार ९२१ धावा काढल्या आहेत. तर ४६३ एकदिवसीय सामन्यात ९६ अर्धशतकं आणि ४९ शतकांच्या मदतीनं सचिनने १८ हजार ४२६ धावा काढल्या आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावावर १०० शतकांची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर ३४ हजारांपेक्षा जास्त धावा आहे. सचिन तेंडुलकरने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 12:16 pm

Web Title: onthisday in 1990 sachin tendulkar scored his first odi fifty nck 90
Next Stories
1 पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा धक्का
2 बुमराह-नटरानमधील हा अजब योगायोग; तुम्हाला माहितेय?
3 युरोपा लीग फुटबॉल : टॉटनहॅम, एसी मिलान बाद फेरीत
Just Now!
X