‘आयपीएल’ ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरल्यावर आपल्या खेळाबरोबरच खेळाडूंनाही ग्लॅमर, प्रसिद्धी, पैसा मिळावा यासाठी ‘इंडियन बॅडमिंटन लीग’ (आयबीएल)च्या गौरवशाली अध्यायाला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव सोमवारी नवी दिल्लीत होणार असून, या निमित्ताने ६६ बॅडमिंटनपटूंचे नशीब फळफळणार आहे. लिलावासाठी प्रसिद्ध असलेल्या लंडनच्या बॉब हटन यांची आयबीएलच्या लिलावाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण १५० आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू या लिलावासाठी उपलब्ध असतील.
अशी असेल संघरचना :
प्रत्येक संघात ११ खेळाडू असतील. यांपैकी जास्तीत जास्त चार खेळाडू परदेशी असू शकतील. त्याचबरोबर एका संघात एक १९ वर्षांखालील खेळाडू घ्यावा लागेल. सहा ‘आयकॉन’ दर्जाच्या खेळाडूंना सुरुवातीला संघ खरेदी करतील. त्यांची मूळ किंमत ५० हजार डॉलर्स एवढी असेल. एखाद्या खेळाडूवर जास्तीत जास्त दीड कोटी रुपयांची बोली लावता येऊ शकेल. त्याचबरोबर संघातील सर्वोत्तम रक्कम घेणाऱ्या खेळाडूच्या १० टक्के अधिक रक्कम आयकॉन खेळाडूला मिळेल.
आयबीएलमधील संघ आणि त्यांचे मालक
१. क्रिश दिल्ली स्मॅशर्स
मालक: क्रिश समूह
२. लखनऊ वॉरियर्स
मालक : सहारा परिवार
३. पुणे पिस्टॉन्स
मालक : बर्मन परिवार
४. मुंबई मास्टर्स
मालक : सुनील गावस्कर, नागार्जुन आणि व्ही. चामुंडेश्वरनाथ
५. बांगा बीट्स
मालक : बीओपी समूह
६. हैदराबाद हॉटशॉट्स
मालक : पीव्हीपी समूह
इंडियन बॅडमिंटन लीग स्पर्धा
स्पर्धेचा कालावधी : १८ दिवस (१४ ते ३१ ऑगस्ट)
एकूण सामने : ९०
सामन्यांची ठिकाणे : नवी दिल्ली, लखनौ, मुंबई, पुणे, बंगळुरू आणि हैदराबाद
लिलावाची वैशिष्टय़े
लिलावासाठी उपलब्ध खेळाडू : १५०
खेळाडूंवर बोली लागणार : ६६
आयकॉन खेळाडू : चोंग वुई, सायना नेहवाल, ज्वाला गट्टा, अश्विनी पोनप्पा, पी. कश्यप आणि पी. व्ही. सिंधू.
लिलावाचे ठिकाण : गंगा, तप्ती आणि व्यास सभागृह, शांग्री-ला हॉटेल, नवी दिल्ली
वेळ : सकाळी ११ वाजल्यापासून.