News Flash

हार्दिक पांड्यानंतर ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू बनला ‘बाप’

हार्दिकनंतर या भारतीय सलामीविराच्या घरी हालला पाळणा

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यानंतर भारताच्या आणखी एका क्रिकेटपटूने आज आनंदाची बातमी दिली आहे. हार्दिक आणि नताशा यांना गुरुवारी पुत्ररत्न झाले होते. त्यानंतर आता भारताचा सलामी फलंदाज अभिनवर मुकंदच्या घरीही पाळणा हालला आहे. अभिनव मुकंदने ट्विट करत आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

भारताचा क्रिकेटपटू अभिनव मुकुंदच्या घरी शनिवारी एक नवा पाहुणा आला आहे. मुकुंद आणि त्याची पत्नी आरभी या दाम्पत्याला पुत्ररत्न झाले आहे. ही माहिती मुकुंदने ट्विटरवरर पोस्ट करून दिली. मुकुंद ट्विट करत म्हणाला की, ” माझी पत्नी आरभी आणि माझ्या आयुष्याला आज एक वेगळे वळण मिळाले आहे. एक पालक म्हणून आमचा प्रवास आजपासून सुरु होत आहे. आज सकाळी आमच्या घरात पुत्ररत्न जन्माला आले आहे.”

अभिनव मुकुंदने भारताकडून सात कसोटी सामने खेळले आहेत. तामीळनाडूच्या या फलंदाजानं २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी संघातून पदार्पण केलं होतं. ७ सामन्यांत मुकुंदने ३२१ धावा केल्या. तामिळनाडूकडून प्रथम श्रेमी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १४५ सामन्यांत १०२५८ धावा आहेत. त्याच्या नावावर तिहेरी शतकही आहे. आयपीएलमध्ये अभिनवर मुकुंद पंजाब संघाकडून खेळतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 10:43 am

Web Title: opening batsman abhinav mukund blessed with baby boy after hardik pandya nck 90
Next Stories
1 Eng vs Ire : सलग दुसऱ्या विजयासह इंग्लंडची मालिकेत बाजी, आयर्लंडवर ४ गडी राखून मात
2 ‘आयपीएल’च्या भवितव्याचा आज निर्णय!
3 कोहलीची पाकिस्तानविरुद्धची खेळी सर्वोत्तम -गंभीर
Just Now!
X