News Flash

ओर्लाडो चॅलेंजर टेनिस स्पर्धा : भारताचा प्रज्ञेश उपांत्यपूर्व फेरीत

तुंग-लिन वूने माघार घेतल्याने प्रज्ञेशला पुढे चाल देण्यात आली.

(संग्रहित छायाचित्र)

भारताचा टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरनने ओर्लाडो चॅलेंजर टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तुंग-लिन वूने माघार घेतल्याने प्रज्ञेशला पुढे चाल देण्यात आली.

अडीच तासांपर्यंत रंगलेल्या सामन्यात प्रज्ञेशने ५-७, ७-५, २-० अशी आघाडी घेतली असताना तुंग याने माघार घेतली. प्रज्ञेश सुरुवातीला पिछाडीवर पडला होता. परंतु त्यानंतर सलग सात गेम जिंकत प्रज्ञेशने निर्णायक सेटमध्ये आघाडी राखली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 12:23 am

Web Title: orlando challenger tennis tournament pragnesh in the semifinals abn 97
Next Stories
1 ICC च्या नियमांमध्ये बदल, टीम इंडियाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतलं अव्वल स्थान गमावलं
2 ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका अजिंक्य रहाणेसाठी असेल आव्हानात्मक – हरभजन सिंह
3 विश्वचषकात टी. नटराजन भारतीय संघासाठी ठरु शकतो X फॅक्टर – व्ही.व्ही.एस लक्ष्मण
Just Now!
X