‘ब्लेड रनर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या धावपटू ऑस्कर पिस्टोरियसला प्रेयसीच्या हत्येप्रकरणी दक्षिण आफ्रिका सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले. या निर्णयामुळे त्याला १५ वर्षांची शिक्षा होऊ शकते.
२०१३मध्ये ऑस्करने राहत्या घरी प्रेयसीची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर त्याला शिक्षाही सुनावण्यात आली. ही शिक्षा कमी व्हावी, याकरिता ऑस्करने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि गुरुवारी त्यावर निर्णय सुनावण्यात आला. या निर्णयामुळे ‘पॅरोल’वर सुटलेल्या ऑस्करला पुन्हा कारागृहात जावे लागणार आहे. ऑस्करला दोषी ठरवल्याचे, न्यायाधीश एरिक लीच यांनी सांगितले.