कसोटीत सचिनच्या चौथ्या क्रमांकावर आता कोण खेळणार असे विचारले असता धोनी म्हणाला, याबाबत आम्हाला अजून ठरवायचे आहे. कुणी कोणाची जागा घेत नसतो असे नमूद करत धोनी मजेत म्हणाला, शक्य झाल्यास आपण चौथा क्रमांकच वगळून टाकूया आणि भारताच्या बॅटींग लाईनअपला १,२,३,५,६..असे अनुक्रमे क्रमांक देऊया.
क्रिकेटविश्वाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने गेली २४ वर्षे कसोटी संघात चौथे स्थान अतिशय खुबीने सांभाळले. पहिल्या दोन विकेट्स पडल्यानंतर भारतीय संघाची संपूर्ण मदार सचिनवर असायची. सचिनही दबावाखाली न येता अतिशय भेदकरित्या फलंदाजीला उतरायचा.
आता सचिनच्या निवृत्तीमुळे भारताच्या कसोटी संघात चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावर मजेशीरपणे उत्तर देताना धोनीने हा क्रमांकच बॅटींग लाईनअपमधून आपण वगळूया कारण सचिनची जागा कोणी घेऊ शकत नाही. असे म्हटले