भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये भारतात आयोजित केली जाणारी विश्वचषक ट्वेन्टी२० स्पर्धा यशस्वी करणे हेच आमचे ध्येय आहे, असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले. ते म्हणाले, आयसीसी या स्पर्धेबाबत जे निर्णय घेईल, त्याची योग्यरीतीने अंमलबजावणी करणे हे आमचे काम आहे. या स्पर्धेत आठ संघांचा समावेश राहील व स्पर्धेतील सामन्यांची कार्यक्रमपत्रिका लवकरच आयसीसीकडून निश्चित केली जाईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 10, 2015 12:01 am