News Flash

Video : घालीन लोटांगण… गोलंदाजाचा खतरनाक यॉर्कर अन् फलंदाज ‘क्लीन बोल्ड’

चेंडू लागल्यानंतर स्टंपदेखील कोलांटी उडी मारत लांब जाऊन पडला

यॉर्कर चेंडू टाकून फलंदाजाला त्रिफळाचीत करावं असं प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं. त्यातच वेगवान गोलंदाजाच्या चेंडूवर फलंदाज लोटांगण घालून क्लीन बोल्ड झाला तर गोलंदाजाला आनंद द्विगुणित होतो. असाच एक आनंदाचा क्षण इंग्लंडच्या कौंटी क्लब क्रिकेट सामन्यात गोलंदाजाच्या वाट्याला आला. यॉर्कशायर संघाचा वेगवान गोलंदाज मॅथ्यू फिशर याने सोमवारी झालेल्या सामन्यात डरहॅम क्लबचा फलंदाज जॉक बर्नहॅम याचा असाच त्रिफळा उडवला. एक अतिशय खतरनाक असा यॉर्कर चेंडू टाकून त्याने त्याला बाद केलं. या चेंडू खेळताच न आल्याने फलंदाजाने त्याक्षणी मैदानावर लोटांगण घातलं.

सामन्यात गोलंदाजी करताना आधी फिशरने फलंदाजाला एक दोन वेळा चेंडू स्विंग करत चकवलं. पण त्यानंतर त्याने अतिशय विचारपूर्वक चेंडू टाकला. चेंडू अपेक्षेपेक्षा धीम्या गतीने आला. पण महत्त्वाचा भाग म्हणजे चेंडू थेट स्टंपवर आदळला. त्या यॉर्कर चेंडूसाठी फलंदाजाकडे काहीच उत्तर नसल्याने चेंडू बॅटने रोखण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, पण सारं निष्फळ ठरलं. चेंडू थेट जाऊन स्टंपवर आदळला आणि स्टंपवर कोलांटी उड्या मारत लांब जाऊन पडला. फलंदाजाला तोल सावरता आला नाही त्यामुळे त्याने थेट मैदानावर लोटांगण घातले.

फिशरने सामन्यात दमदार गोलंदाजी करत १९ षटकांच्या एकूण गोलंदाजीत ५४ धावा देत ४ बळी टिपले. त्यातील या विकेटने साऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. ट्विटरवरदेखील यॉर्कशायर संघाने व्हिडीओ पोस्ट केल्यावर त्याला तुफान प्रतिसाद मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 3:06 pm

Web Title: outstanding yorkshire pace bowler floors batsman sends stumps cartwheeling with unplayable yorker see video vjb 91
Next Stories
1 Viral जाहिरात : बाजारात आला ‘राफेल पान मसाला’
2 रत्नागिरीत खळबळ, करोना रूग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात घुसून मृतदेह नेला आणि…
3 राम मंदिर भूमिपूजन : ८०० किलोमीटरचा प्रवास करुन मुस्लीम भाविक राहणार सोहळ्याला उपस्थित
Just Now!
X