28 October 2020

News Flash

सेंट लुइस बुद्धिबळ स्पर्धा :  हरिकृष्णची कार्लसनवर मात

या कामगिरीमुळे हरिकृष्णने अर्मेनियाच्या लेव्हॉन अरोनियनसह संयुक्तपणे सहावे स्थान प्राप्त केले आहे.

| September 20, 2020 02:17 am

पी. हरिकृष्ण

चेन्नई : भारताचा ग्रँडमास्टर पी. हरिकृष्ण याने जगज्जेत्या मॅग्नस कार्लसन याला पराभवाचा धक्का दिला. मात्र दिवसभरातील अन्य चार डावांत पराभवाचा सामना करावा लागल्याने त्याची सेंट लुईस ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

हरिकृष्णने अतिजलद प्रकारात पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या कार्लसनला ६३ चालींत पराभूत केले. त्यानंतर त्याने अर्मेनियाच्या जेफ्री झियाँग याच्यावरही विजय मिळवला. पण नंतर तीन बरोबरींसह हरिकृष्णला चार पराभव पत्करावे लागले. अमेरिकेचा लेइनर डॉमिंगेझ आणि वेस्ली सो, रशियाचा अलेक्झांडर ग्रिशूक तसेच इराणचा अलिरेझा फिरौझा यांनी हरिकृष्णवर मात केली. या कामगिरीमुळे हरिकृष्णने अर्मेनियाच्या लेव्हॉन अरोनियनसह संयुक्तपणे सहावे स्थान प्राप्त केले आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2020 2:17 am

Web Title: p harikrishna stuns magnus carlsen but later suffers four losses zws 70
Next Stories
1 ‘एमसीए’च्या कार्यकारिणीची मंगळवारी तातडीची बैठक
2 नव्या विजेत्यांचे राज्य!
3 डाव मांडियेला : दुसऱ्या हाती छोटं पान
Just Now!
X