News Flash

हैदराबाद-मुंबई विमान प्रवासादरम्यान वाईट वागणूक मिळाल्याने पी.व्ही. सिंधू संतापली

सिंधूने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलचा संताप व्यक्त केला.

P V Sindhu : पी.व्ही. सिंधू शनिवारी इंडिगो एअरलाईन्सच्या ६ई ६०८ या विमानाने हैदराबादहून मुंबईला येत होती. यावेळी विमानतळावरील अजितेश या कर्मचाऱ्याकडून आपल्याला अत्यंत वाईट वागणूक मिळाल्याचे पी.व्ही.सिंधू हिने म्हटले आहे.

भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिला विमानप्रवासादरम्यान एका कर्मचाऱ्याकडून वाईट वागणूक मिळाल्याची घटना घडली आहे. पी.व्ही. सिंधू शनिवारी इंडिगो एअरलाईन्सच्या ६ई ६०८ या विमानाने हैदराबादहून मुंबईला येत होती. यावेळी विमानतळावरील अजितेश या कर्मचाऱ्याकडून आपल्याला अत्यंत वाईट वागणूक मिळाल्याचे पी.व्ही.सिंधू हिने म्हटले आहे. सिंधूने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलचा संताप व्यक्त केला. याशिवाय, सिंधूने सुरूवातीला ट्विटमध्ये मुंबईचा उल्लेख ‘बॉम्बे’ असा केला होता. मात्र, आपली चूक लक्षात आल्यानंतर तिने लगेचच माफी मागितली. दरम्यान, या प्रकरणात प्रशासनाकडून संबंधित कर्मचाऱ्यावर काही कारवाई करण्यात आली का, याचा तपशील अजूनपर्यंत उपलब्ध होऊ शकलेला नाही.

Next Stories
1 राजकोटवर राज्य कुणाचे?
2 प्रो कबड्डीच्या किमयागाराची ८१.७५ लाख कमाई
3 Ranji Trophy : मयंक अग्रवालच्या साक्षीनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्रिशतकांची पन्नाशी!
Just Now!
X