24 January 2020

News Flash

बजरंग पुनियासह प्रमुख क्रीडापटू पद्म पुरस्काराने सन्मानित

राष्ट्रपती कोविंद यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज पद्म पुरस्कारांचं वितरण केलं. विविध क्षेत्रातील नामवंत 47 जणांना आज पद्म पुरस्कार देण्यात आला, ज्यामध्ये 9 क्रीडापटूंचाही समावेश होता. कुस्तीपटू बजरंग पुनिया, क्रिकेटर गौतम गंभीर, फुटबॉल कर्णधार सुनिल छेत्री, बास्केटबॉलपटू प्रशांती सिंह, तिरंदाज बोम्बायला देवी, ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली, भारताचा कबड्डी कर्णधार अजय ठाकूर आणि टेबल टेनिसपटू अंचता शरथ कमाल यांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.

1984 साली माऊंट एव्हरेट्सवर जाणाऱ्या पहिल्या महिला भारतीय बनण्याचा मान पटकावणाऱ्या बचेंद्री पाल यांचाही आज सत्कार करण्यात आला. खडतर प्रसंगावर मात करत आपली नवीन ओळख निर्माण करणाऱ्या बचेंद्री यांचा पद्मभुषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.

पद्म पुरस्कार विजेच्या क्रीडापटूंची यादी पुढीलप्रमाणे –

  • बचेंद्री पाल (गिर्यारोहण) – पद्मभुषण (उत्तराखंड)
  • बोम्बायला देवी (तिरंदाजी) – मणिपूर
  • प्रशांती सिंह (बास्केटबॉल) – उत्तर प्रदेश
  • गौतम गंभीर (क्रिकेट) – दिल्ली
  • सुनील छेत्री (फुटबॉल) – तेलंगाणा
  • अजय ठाकूर (कबड्डी) – हिमाचल प्रदेश
  • शरथ कमाल (टेबल टेनिस) – तामिळनाडू
  • बजरंग पुनिया (कुस्ती) – हरियाणा
  • हरिका द्रोणावल्ली (बुद्धीबळ) – आंध्र प्रदेश

First Published on March 11, 2019 5:40 pm

Web Title: padma awards 2019 bajrang punia ajay thakur honoured by president ram nath kovind
टॅग Bajrang Puniya
Next Stories
1 Video: पुढील आयपीएल पाकिस्तानमध्येच होणार – उमर अकमल
2 बुमराहची शैली धोकादायक, बळावू शकतो पाठीचा विकार !
3 मॅचफिक्सींग खुनापेक्षा भयंकर अपराध – महेंद्रसिंह धोनी
Just Now!
X