News Flash

Video : वेडा आहेस का, गोलंदाजी कोण करेल? जेव्हा शाहिद आफ्रिदी आपल्याच सहकाऱ्याला सुनावतो

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी, सध्या Global T-20 Canada स्पर्धेत खेळत आहे. Brampton Wolves संघाकडून खेळत असताना आफ्रिदीने ४० चेंडूत ८१ धावांची खेळी केली. आफ्रिदीच्या या खेळीच्या जोरावर Brampton Wolves संघाने Edmonton Royals संघावर २७ धावांनी मात केली. मात्र या सामन्यानंतर आफ्रिदी त्याच्या आक्रमक फलंदाजीऐवजी एका वेगळ्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

फलंदाजीदरम्यान अखेरचा चेंडू खेळत असताना, आफ्रिदीने फटका खेळून एक धाव काढली. यादरम्यान नॉन स्ट्राईक एंडवर उभ्या असलेल्या वहाब रियाझने आफ्रिदीला आणखी एक धाव काढायची का असं विचारलं असता, आफ्रिदीने आपल्या मजेशीर शैलीत त्याला उत्तर दिलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

शाहिद आफ्रिदीने आपल्या खेळीत १० चौकार आणि ५ षटकार लगावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2019 5:32 pm

Web Title: pagal hai says shahid afridi to wahab riaz call for a second run watch video here psd 91
टॅग : Shahid Afridi
Next Stories
1 Thailand Open Badminton : दुसऱ्याच फेरीत सायना नेहवाल पराभूत
2 ऑलिम्पिक पदक मिळवणं सोपी गोष्ट नाही, मी पूर्ण प्रयत्न करेन – मेरी कोम
3 टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी २ हजार अर्ज
Just Now!
X