29 September 2020

News Flash

CoronaVirus : ….यासारखं दु:ख कुठेच नाही ! मुलीच्या आठवणीने शाकीब अल-हसन झाला भावूक

अमेरिकेवरुन परत आला आहे शाकीब

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या संपूर्ण जगभरात आणीबाणीची परिस्थिती तयार झालेली आहे. चीन, इटली यासारख्या देशांमध्ये करोनामुळे अनेक नागरिकांचा जीव गेला आहे. भारतामध्येही प्रत्येक दिवशी करोनाचे रुग्ण सापडत असून काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. क्रीडा विश्वालाही करोनाचा फटका बसला आहे. अनेक खेळाडूंना करोनाची लागण झालेली आहे. बांगलादेशचा क्रिकेटपटू शाकीब अल हसन नुकताच अमेरिकेला जाऊन आला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाकीबने स्वतःला परिवारापासून वेगळं ठेवलं आहे. या काळात आपल्याला आपल्या मुलीला पाहता येत नाहीये, आणि यासारखं दुःख कुठेच नाही असं शाकीबने आपल्या फेसबूक व्हिडीओ पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“मी काही दिवसांपूर्वी अमेरिकेतून परत आलो. विमानात असतानाही मला चिंता होतीच. माझ्या पद्धतीने मी पूर्णपणे स्वच्छता पाळण्याचा प्रयत्न केला. पण बांगलादेशला परतल्यानंतर अधिकाऱ्यांनी मला खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला. सरकारतर्फे सांगण्यात आलेल्या सूचना मी पाळतो आहे, पण मुलीला पाहता येत नाहीये, यासारखं दु:ख कुठेच नाही. पण सध्याच्या घडीला हे करणं गरजेचं आहे.”

यादरम्यान शाकीबने आपल्या चाहत्यांनाही खबरदारी घेत घरातच राहण्याचा सल्ला दिला. दरम्यान भारतातही बीसीसीआय आयपीएल स्पर्धा रद्द करण्याच्या विचारात आहे. जपाननेही यंदाचं ऑलिम्पिक २०२१ पर्यंत पुढे ढकललं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 3:03 pm

Web Title: painful that i cant see my daughter shakib al hasan in self isolatio on reaching usa psd 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 “हिंदू म्हणूनच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं माझ्याकडे दुर्लक्ष”
2 आयपीएलच्या शक्यता मावळल्या, संघमालक आर्थिक नुकसान सोसण्याच्या तयारीत
3 सलाम! करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देणार सहा महिन्यांचा पगार
Just Now!
X