लंडनच्या हॉटेलमधील एका महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपांमुळे पाकिस्तानी क्रिकेट संघाचे मसाजिस्ट मलंग अली यांची मायदेशी रवानगी करण्यात आली आहे. मात्र पत्नी आजारी असल्याने आपण पाकिस्तानात परतल्याचे अली यांनी म्हटले आहे.
‘‘पाकिस्तानी संघाच्या मसाजिस्टने आपला लैंगिक छळ झाल्याची तक्रार एका महिला कर्मचाऱ्याने केल्याचे हॉटेल व्यवस्थापनाने पाकिस्तानी संघ व्यवस्थापनाला कळवले आहे. संघ व्यवस्थापनाने या प्रकरणी चौकशी केल्यानंतर दोषी आढळलेल्या  मलंग यांना मायदेशी पाठवण्यात आले. मायदेशी परतल्यावर पाकिस्तानी क्रिकेट मंडळातर्फे चौकशी करण्यात आल्यानंतर मलंग यांनी पदावरून काढून टाकण्यात आले,’’ असे सूत्रांनी सांगितले.