24 November 2020

News Flash

पाकिस्तानच्या हाफीजचा विक्रम! ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच पुरूष क्रिकेटपटू

इंग्लंडचा पाकिस्तानवर अखेरच्या षटकात विजय

टी२० क्रिकेट मालिकेत इंग्लंडने शेवटच्या षटकात पाकिस्तानवर विजय मिळवला. पहिला सामना पावसाने वाया गेल्यानंतर दुसरा सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-०ची आघाडी घेतली. बाबर आझम, मोहम्मद हाफीज यांच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडला २० षटकात १९६ धावांचे आव्हान दिले होते. इयॉन मॉर्गन आणि डेव्हिड मलान यांच्या धडाकेबाज खेळींच्या जोरावर इंग्लंडने शेवटच्या षटकात विजय मिळवला.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९५ धावा केल्या. कर्णधार बाबर आझमने ५६ तर मोहम्मद हाफीजने ६९ धावा केल्या. हाफीजने ५ चौकार आणि ४ षटकार लगावले. याचसोबत हाफीजने टी२० क्रिकेटमधील २००० धावांचा टप्पा गाठला. २००० धावा आणि ५० बळी अशी दुहेरी कामगिरी करणारा हाफीज पहिलाच पुरूष क्रिकेटपटू ठरला. तसेच, २००० टी२० धावा करणारा तो पाकिस्तानचा तिसरा तर जगातील नववा खेळाडू ठरला. त्याच्या फटकेबाजीमुळेच पाकिस्तानला द्विशतकानजीक पोहोचता आले.

१९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने अर्धशतकी सलामी दिली. टॉम बॅन्टन फटकेबाजी करताना बाद झाला, पण जॉनी बेअरस्टोने २४ चेंडूत ४४ धावा केल्या. तो बाद झाल्यावर मॉर्गन आणि मलान जोडीने दमदार कामगिरी केली. मॉर्गन ६६ धावांवर बाद झाला, पण मलान ५४ धावा करून नाबाद राहिला. ३३ चेंडूत ६६ धावा ठोकणाऱ्या मॉर्गनला सामनावीर घोषित करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 2:05 pm

Web Title: pakistan all rounder mohammad hafeez becomes first male cricketer to score 2000 runs and take 50 wickets in t20is vjb 91
Next Stories
1 जोपर्यंत शरीर साथ देतंय, तोपर्यंत खेळत राहीन ! – इशांत शर्माचा निर्धार
2 रैनाच्या जागी खेळणार ‘हा’ मराठमोळा फलंदाज; CSKच्या मालकांनी दिले संकेत
3 VIDEO: कमाल… बॅन्टनने लगावलेला हा विचित्र षटकार पाहाच
Just Now!
X