भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये गेले काही वर्षे राजकीय तणाव आहे. क्रिकेटच्या मैदानावरही त्याचा प्रत्यय आला आहे. ICCच्या अधिकृत स्पर्धा वगळता भारताचा संघ पाकिस्तानशी क्रिकेट खेळत नाही. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंकडून आणि बोर्डाकडून अनेकदा प्रयत्न झाले पण भारताने त्यांचा प्रस्ताव नाकारला. आता २०२१चा टी-२० विश्वचषक भारतात खेळवण्यात येणार आहे. या विश्वचषकाच्या आयोजनासंदर्भात पाकिस्तानच्या बोर्डाकडून भारताकडे एक मागणी करण्यात आली आहे.
‘मुंबई इंडियन्स’च्या फलंदाजाचा दणका; ठोकल्या ९४ चेंडूत १७३ धावा
“ICC मध्ये बीग थ्री म्हणजेच भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन संघांना अधिक महत्त्व दिलं जातं. ती विचारसरणी बदलली जायला हवी. भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी केवळ पाकिस्तानच्या खेळाडूंनाच नव्हे तर चाहते, अधिकारी आणि पत्रकारांनाही व्हिसा मंजूर केला जाईल असं लेखी हमीपत्र भारताने पाकिस्तानला द्यावं”, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन एहसान मणी यांनी पीटीआयशी बोलताना केली.
IPL 2021: दिल्लीला मोठा धक्का; स्टार खेळाडू म्हणतो, “IPL पेक्षा देश महत्त्वाचा…”
“आम्ही ICCला विनंती केली आहे की आम्हाला भारताकडून या संदर्भातील लेखी हमीपत्र मार्चअखेरपर्यंत मिळायला हवे. म्हणजे आम्ही नक्की कशापद्धतीची तयारी करायची याची आम्हाला कल्पना येईल. आणि हमीपत्र देण्यास नकार मिळाला तर आम्ही विश्वचषक स्पर्धेचे ठिकाण युएईला हलवण्यात यावे अशी मागणी करू”, असे संकेत मणी यानी दिले.
अर्जुनवर टीका करणाऱ्यांना सारा तेंडुलकरचं सडेतोड उत्तर, म्हणाली…
२०१६ साली टी२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले होते. त्यावेळी पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा देण्यात आला होता. पण राजकीय वातावरण पाहता भारत-पाक सामना नियोजित स्थळावरून दुसरीकडे हलवण्यात आला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2021 5:49 pm