पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमलला क्लब क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली आहे. याच महिन्यात त्याच्या रिहॅबची प्रक्रिया सुरू झाली. भ्रष्टाचाराची माहिती लपवल्याबद्दल अकमलने जुलै महिन्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (पीसीबी) माफी मागितली होती. ३१ वर्षीय अकमलवर या कारणास्तव बोर्डाने तीन वर्षांची बंदी घातली होती, जी यावर्षी कमी करण्यात आली.

पीसीबीने बुधवारी अकमलबाबत माहिती दिली. उमरला त्याच्या चुकांची जाणीव आहे आणि त्याने बंदी आणि रिहॅबसंबंधित संपूर्ण प्रक्रिया पाळली आहे, असे बोर्डाने सांगितले. त्याचा रिहॅबसंबंधित कालावधी पुढील महिन्यात संपण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर तो २०२१-२२ या काळात पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामात सहभागी होण्यास पात्र ठरेल.

 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यापूर्वी उमर अकमलचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये अकमलने त्याच्या कृत्याबद्दल क्रिकेट चाहत्यांकडे माफी मागितली होती. पाकिस्तान सुपर लीगच्या पाचव्या हंगामापूर्वी संशयास्पद कार्यात गुंतल्याबद्दल पीसीबीने उमर अकमलला निलंबित केले होते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Khel Shel (@khelshel)

हेही वाचा – IND vs ENG 1st TEST : लंचपर्यंत इंग्लंडची वाईट अवस्था, संघाला सावरण्यासाठी रूट मैदानात

यापूर्वीही उमर अकमल वादात सापडला होता. पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा उमर अकमल हा एक अतिशय अनुशासनहीन क्रिकेटपटू असल्याचे मत अनेकांनी दिले होते. पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी त्याला मानसिक आजार बरे करणाऱ्या डॉक्टरांकडून उपचार घेण्याचा सल्लाही दिला होता.