कराची : पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमल याच्यावर शिस्तपालन समितीने तीन वर्षांची बंदी घातली असली तरी त्याआधी त्याने संशयित सट्टेबाजांसोबत झालेल्या बैठकांमधील माहिती सांगण्यास नकार दिला आहे. लाहोर येथील डिफेन्स हाऊसिंग सोसायटीमध्ये अकमलने दोन अज्ञात व्यक्तींसोबत चर्चा केली होती. ‘‘उमर अकमलने या दोन व्यक्ती त्या इमारतीमधील होत्या, असा दावा केला आहे. पण अकमलने या बैठकीतील माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १९ आणि २० फेब्रुवारी रोजी कराची येथे प्रथमदर्शनी अहवाल सादर केला, त्यावेळी अकमलने आपण चूक केल्याचे कबुल केले होते,’’ असे पाकिस्तान क्रिकेट मंडळातील सूत्रांनी सांगितले.