News Flash

पाकिस्तानी वंशाचा फवाद अहमद झाला ‘ऑस्ट्रेलियन’

पाकिस्तानी वंशाचा खेळाडू फवाद अहमदला ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व देण्यात आले आहे. १० जुलै पासून इंग्लंडमध्ये होणाऱया क्रिकेट मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात फिरकी गोलंदाज फवाद अहमदची निवड करण्यात

| July 2, 2013 02:14 am

पाकिस्तानी वंशाचा खेळाडू फवाद अहमदला ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व देण्यात आले आहे. १० जुलै पासून इंग्लंडमध्ये होणाऱया क्रिकेट मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात फिरकी गोलंदाज फवाद अहमदची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे फवाद अहमदकडे ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व असणे गरजेचे होते. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलिया अ संघातून फवाद अहमदने चांगली कामगिरी केल्यानंतर इंग्लंडमधील मालिकेसाठी अहमदचा संघात समावेश करण्याचा विषय पुढे आला. ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व मिळाल्यानंतर फवाद अहमद म्हणाला, मी अजूनही आश्चर्यचकित आहे. हा माझ्यासाठी चांगला सन्मान आहे. मला ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व मिळाले आहे आणि आता मी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करु शकतो. चांगल्या खेळातून क्रिकेटमध्ये उज्वल भविष्य साकारण्याचे माझे लक्ष्य आहे.
फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या निवृत्तीनंतर सध्याच्या ऑस्ट्रेलिया संघाने डजनभर फिरकी गोलंदाजांचा समावेश करून पाहिला परंतु, पाहिजे तसे यश फिरकी गोलंदाजांना मिळालेले नाही. फवाद अहमदच्या समावेशानंतर शेन वॉर्नची कमतरता भरुन काढेल अशी चर्चा ऑस्ट्रेलिया क्रिकेट रसिकांमध्ये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 2:14 am

Web Title: pakistan born ahmed can be an aussie
Next Stories
1 सुरेश कलमाडींना दे धक्का! आशियाई अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या निवडणुकीत पराभूत
2 रोहित शर्माचे अर्धशतक भारताची ७ बाद २२९ अशी समाधानकारक धावसंख्या
3 ‘सामन्यात महेंद्रसिंग धोनी नसल्याची उणीव जाणवली’- विरोट कोहली
Just Now!
X