News Flash

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आपल्या चुलत बहिणीशी केला साखरपुडा

पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू अझर अलीने अलिकडे बाबरला लग्न करण्याचा सल्ला दिला होता.

पुढच्या वर्षी विवाहबंधनात अडकणार

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमच्या चाहत्यांसाठी खूप चांगली बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार बाबर आझमने साखरपुडा केला आहे. बाबरने आपल्या चुलत बहिणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षी या दोघांचे लग्न होणार आहे. २६ वर्षीय बाबर तीनही स्वरूपात संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे.

पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू अझर अलीने अलिकडे बाबरला लग्न करण्याचा सल्ला दिला होता. बाबरने आता व्यस्त रहावे असे अझरने सांगितले होते. त्यामुळे बाबरने अझरचा सल्ला फार गंभीरपणे घेतलेला दिसतो.

हेही वाचा – विराट कोहली ‘वीगन’ आहे की नाही?

बाबरवर झाला होता लैंगिक अत्याचाराचा आरोप

काही महिन्यांपूर्वी बाबर आझमवर एका महिलेने लैंगिक अत्याचार आणि धमकावल्याचा आरोप केला होता. बाबरने लग्नाची आश्वासने दिली असल्याचे या महिलेने सांगितले होते. लाहोरमधील कोर्टाने पाकिस्तानच्या केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला एफआयआर नोंदविण्याचे आदेशही दिले होते. बाबरने मात्र स्वतःवरील आरोप फेटाळून लावले होते.

हेही वाचा – अभिनंदन..! पंजाब किंग्जचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरननं केलं लग्न

बाबर आझम सध्या अबुधाबीमध्ये असून तेथे तो पीएसएल-६चे उर्वरित सामने खेळणार आहे. बाबरचा संघ बुधवारी मुल्तान सुलतान्सशी भिडणार आहे. या हंगामात बाबरने चांगली कामगिरी केली होती. पीएसएल थांबविण्यात आले, तेव्हा बाबर आझमने ५ सामने खेळत २५८ धावा केल्या. यात त्याने ३ अर्धशतकेही ठोकली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 5:45 pm

Web Title: pakistan captain babar azam gets engaged to his cousin sister adn 96
Next Stories
1 विराट कोहली ‘वीगन’ आहे की नाही?
2 टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजाला जाणवली करोनाची लक्षणे, आईलाही केलंय रुग्णालयात दाखल
3 अभिनंदन..! पंजाब किंग्जचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरननं केलं लग्न
Just Now!
X