भारत आणि पाकिस्तान संघामध्ये कोणत्याही खेळात होणारा सामना हा आपोआपच चर्चेचा विषय ठरतो. त्यातही क्रिकेटचा सामना असेल तर सामान्यांबरोबरच क्रिकेट मंडळांसाठीही तो प्रतिष्ठेचा विषय ठरतो. काल आशियाई चषक स्पर्धेमध्ये दोन्ही संघांदरम्यान झालेला सामनाही असाच ठरला. भारताने हा सामना आठ गडी राखून सहज खिशात टाकला.

हाँगकाँगचा सलग दोन सामन्यांमध्ये पराभव झाल्याने मालिकेच्या दृष्टीने हा तरीही सामन्याआधीपासूनच या सामन्याची जोरदार चर्चा सुरु होती. दोन्ही बाजूकडील पाठीराखे आपआपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी अगदी ऑफलाइन आणि ऑनलाइनही उत्साह दाखवत होते. याच उत्साहाच्या भरात पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने भारतीय संघाला ट्रोल करणारे ट्विट केले. आणि एका चुकीमुळे ते स्वत:च ट्रोल झाले. भारत पाकिस्तान याआधी एकमेकांसमोर आलेले तेव्हा काय झाले होते अशा आशयाचे ट्विट करताना पाकिस्तीनी क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटमध्ये happened ऐवजी hepoened लिहीले.

मग काय भारताला इतिहासाची आठवण करुन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी बोर्डाची ही व्याकरणातील चूक नेटकऱ्यांच्या नजरेतून सुटली नाही आणि त्यांना भारतीय नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरत ट्रोल केले. अगदी या शब्दाचा अर्थ काय पासून ते तुम्ही ट्विटमध्ये गोंधळ घातला आहे इतकंही नेटकऱ्यांनी सांगितले. पाहुयात काय म्हणाले आहेत नेटकरी यावर…

काय झालयं यांना…

अर्थ तरी सांगा…

पुन्हा होणार नाही

पाकिस्तान आणि इंग्रजीचा एवढाच संबंध येतो

बॉम्ब बनवायला शिकवण्याआधी शाळा बांधा आणि शिक्षण द्या

जाऊ द्या नाही जमणार

कोणती भाषा आहे ही

या ओळी राहिल्या

इंग्रजी विकत घेता येणार नाही

इंग्रजीबरोबरच खेळले पाकिस्तानी

कधी कधी वाटतं…

पण हे झालयं…

याच बरोबर इतर अनेकजणांनी या hepoened वाल्या ट्विटवरून पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाची खिल्ली उडवली आहे. अनेकदा पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या इंग्रजीवरून त्यांना ट्रोल केले जाते. मात्र आता चक्क पीसीबीच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरूनच इंग्रजी भाषाशी झालेला हा खेळ नक्कीच हस्यास्पद आहे असेच म्हणावे लागेल.